ISRO Prepares for 2029 Close Encounter with Asteroid Apophis esakal
विज्ञान-तंत्र

Asteroid Alert: पृथ्वी नष्ट होण्यापासून वाचवण्यासाठी भारत बजावणार महत्वाची भूमिका, ISRO चीफ सोमनाथ काय म्हणाले?

ISRO Mission: पृथ्वीच्या ३२,००० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या लघुग्रहाचा अभ्यास करून त्याचा पृथ्वीला असणारा धोका रोखण्यासाठी उपाययोजनांची रूपरेषा आखण्यात येणार आहे.

Saisimran Ghashi

ISRO : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) २०२९ मध्ये पृथ्वीच्या अगदी जवळ येणार्‍या अपोफिस लघुग्रहाचा अभ्यास करण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रयत्नांमध्ये सहभागी होण्यास उत्सुक आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस. सोमनाथ यांनी अलीकडे झालेल्या कार्यशाळेत ही माहिती दिली.

पृथ्वीच्या ३२,००० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या लघुग्रहाचा अभ्यास करून त्याचा पृथ्वीला असणारा धोका रोखण्यासाठी उपाययोजनांची रूपरेषा आखण्यात येणार आहे. या लघुग्रहामुळे पृथ्वीला धोका पोहोचण्याची शंका असून त्याच्या अभ्यासासाठी इस्रो जपान, युरोप आणि अमेरिकेच्या अंतराळ संस्थांशी सहकार्य करण्याची शक्यता आहे.

संस्थेचे सहयोगी डॉ. अनिल कुमार यांनी २००४ मध्ये इस्रोच्या वेधशाळांनी ३४० मीटर व्यासाचा अपोफिस हा लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळ येत असल्याचे आढळले होते. त्यावेळी पृथ्वीला धडकेचा संभव धोका असल्याचे आढळले होते.

हा लघुग्रह दर ३६० दिवसांनी पृथ्वीच्या आसपास येतो. १३ एप्रिल २०२९ रोजी तो ३२,००० किलोमीटर अंतरावर येणार असून २०३६ मध्ये तो पुन्हा येण्याची शक्यता आहे. पण त्यावेळी तो पृथ्वीपासून अधिक लांब असेल. मात्र, गुरुत्वाकर्षणातील बदलामुळे २०३६ मध्ये त्याच्या पृथ्वीशी धडकेची शंका असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.

आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिनानिमित्त झालेल्या या कार्यशाळेतून अवकाशातील धोक्याविषयी जनजागृती करणे, क्षुद्रग्रहांच्या अभ्यासाचे महत्त्व अधोरेखित करणे आणि पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी नावीन्यपूर्ण उपाययोजनांना प्रोत्साहन देणे हा उद्देश होता.

अमेरिकेच्या अंतराळ संस्थेने (NASA) २०२२ मध्ये केलेले डार्ट मिशन (DART mission) या उदाहरणाचा डॉ. सोमनाथ यांनी दाखला दिला. या मिशनाद्वारे अंतराळातील क्षुद्रग्रहाची दिशा थोडीशी बदलण्यात आली होती.

“अशी लघुग्रह पृथ्वीला धडकणार असल्याची माहिती काही वर्षांपूर्वी मिळाली तर मोठी गडबड उडेल. त्याआधीच जर आपण कृती केली तर उत्तम. म्हणून लघुग्रह समजून घेण्यासाठी त्यांच्या जवळ जाणे गरजेचे असते. DART मिशन हे त्याचेच उदाहरण आहे,” असे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

Latest Maharashtra News Updates : "खरी लाचारी आज बघितली" उपमुख्यमंत्री शिंदेंनी जय गुजरात दिलेल्या घोषणेवर मनसे नेत्याची टीका

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

ती खूपच बारीक, काळी-सावळी... प्रियांका चोप्राला पहिल्यांदा पाहिल्यावर थक्क झालेली मराठी अभिनेत्री; म्हणाली- ती हिरोईन बनायला आलेली...

FASTag Annual Pass: FASTag वार्षिक पास घ्यायचा विचार करताय? मग घेण्यापूर्वी 'हे' 11 महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची सविस्तर उत्तरं जरूर वाचा!

SCROLL FOR NEXT