ISRO Aditya L1 Update eSakal
विज्ञान-तंत्र

ISRO Aditya L1 : चंद्र टप्प्यात, अन् सूर्याकडे झेप घेण्यासाठी इस्रो सज्ज! श्रीहरीकोटामध्ये पोहोचला 'आदित्य एल-1' उपग्रह

Aditya L1 Mission : सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात याचं प्रक्षेपण होण्याची शक्यता आहे.

Sudesh

ISRO Solar Mission : देशाची महत्त्वाकांक्षी चांद्रमोहीम आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. चांद्रयान-3 हे येत्या काही दिवसांमध्येच चंद्रावर लँड होईल. याकडे लक्ष असतानाच, इस्रोने दुसरीकडे आपल्या सौरमोहीमेची सुरूवातही केली आहे. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी पाठवण्यात येणारा 'आदित्य एल-1' हा उपग्रह श्रीहरीकोटामध्ये पोहोचला आहे.

मंगळवारी हा उपग्रह आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथे नेण्यात आला. याठिकाणी असलेल्या सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्रावरून हा उपग्रह अंतराळात प्रक्षेपित करण्यात येईल. इस्रोने या लाँचिंगची तारीख अद्याप जाहीर केली नसली, तरी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हे प्रक्षेपण होण्याची शक्यता आहे.

काय आहे मोहीम?

सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रोची ही पहिली सौरमोहीम असणार आहे. यामध्ये आदित्य एल-1 हा उपग्रह सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये असणाऱ्या एका लँग्रेज पॉइंटवर पोहोचवण्यात येईल. या कक्षेत राहून हा उपग्रह कोणत्याही अडथळ्याशिवाय सूर्याचे सातत्याने निरीक्षण करेल. (Aditya L1 Update)

सूर्यदेवाचं दुसरं नाव 'आदित्य' हे या उपग्रहाला देण्यात आलं आहे. ज्या ठिकाणी हा उपग्रह सोडण्यात येईल, त्या पॉइंटला L1 असं नाव आहे. त्यामुळे इस्रोच्या या मोहिमेला Aditya L1 असं म्हटलं जात आहे. (ISRO Sun Mission)

चांद्रयानाच्या लँडिंगनंतर प्रक्षेपण

भारताचं चांद्रयान-3 हे सध्या यशस्वीपणे आपल्या मोहिमेचे सर्व टप्पे पार पाडत आहे. यामुळे साधारणपणे 23 ऑगस्ट रोजी हे यान चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. हे लँडिंग झाल्यानंतर कदाचित इस्रो आदित्यच्या प्रक्षेपणाची तारीख जाहीर करेल. (Chandrayaan 3 Update)

कसा असणार उपग्रह

या उपग्रहामध्ये सात उपकरणं असतील. यातील चार उपकरणं सूर्याच्या फोटोस्फिअर, क्रोमोस्फिअर आणि सूर्याचा पृष्ठभाग म्हणजेच कोरोनावर लक्ष ठेवतील. इतर तीन उपकरणं ही L1 पॉइंटवर असणाऱ्या कणांचा आणि आजूबाजूच्या गोष्टींचा अभ्यास करतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT