Mars Mission ISRO Mangalyaan 2 esakal
विज्ञान-तंत्र

Mangalyaan 2 : इस्रो मंगळ ग्रहावर उडवणार हेलिकॉप्टर ; लवकरच देणार मंगळयान २ बद्दलची गुडन्यूज, जाणून घ्या कधी होणार लाँच

ISRO Mars Mission : इस्रो पुन्हा एकदा 'MOM' साठी सज्ज,मुख्य मोहिमेपूर्वी एक रिले संपर्क उपग्रह प्रक्षेपित करणार

Saisimran Ghashi

ISRO : मंगळ ग्रह हा आपल्या पृथ्वीपासून सुमारे 225 दशलक्ष किलोमीटर अंतरावर आहे. एवढा दूरचा प्रवास करणे अवघड असले, तरी 50% पेक्षा कमी यशस्वी दर असूनही आत्तापर्यंत जगातील अंतराळ संस्थांनी 50 पेक्षा जास्त अंतराळ मोहिमा मंगळावर पाठवल्या आहेत. एवढंच नव्हे तर भारताचे मंगळयान-1 या मोहिमेच्या यशस्वी प्रयोगानंतर आता इस्रो आणखी महत्वाकांक्षी आणि तंत्रज्ञानपुर्ण मोहिमेसाठी सज्ज झाले आहे.

मंगळयान-2 ही मोहिम फक्त निरीक्षणापुरती थांबणार नाही. भारताला एक आघाडीचा शोधक बनवण्यासाठी ही मोहिम महत्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. या मोहिमेच्या माध्यमातून मंगळाच्या पृष्ठभागाचे नकाशे तयार करणे आणि मौल्यवान वैज्ञानिक माहिती गोळा करणे हा उद्देश आहे. भविष्यातील शोध मोहिमांसाठी हा मार्गदर्शक ठरेल.

मंगळयान-2 ची वैशिष्टपूर्ण बाबी म्हणजे हे नवीन तंत्रज्ञान. हे यान जुन्या पद्धतीने (एअरबॅग्स आणि रॅम्प) न उतरता एका अत्याधुनिक आकाश क्रेनच्या साहाय्याने मंगळावर उतरवले जाणार आहे. ही पद्धत मंगळाच्या आव्हानात्मक भूपृष्ठभागावर सुखरूप आणि अचूक लँडिंग सुनिश्चित करते. इतकेच नव्हे तर, अतिशय सुपरसॉनिक पॅराशूटचा वापर करून मंगळाच्या वातावरणात होणाऱ्या वेगवान उतरणाचा वेग कमी केला जाणार आहे.

या मोहिमेतील आणखी एक रोमांचक वैशिष्ट्य म्हणजे मंगळावरील अतिशय तनु वातावरणात उड्डाण करणारा हेलीकॉप्टर (MarBLE - Martian Boundary Layer Explorer). हे यशस्वी झाल्यास अमेरिकेच्या Ingenuity Mars Helicopter नंतर मंगळावर हेलीकॉप्टर उडविणारा भारत हा दुसरा देश ठरेल.

या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी इस्रो मुख्य मोहिमेपूर्वी एक रिले संपर्क उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. हा उपग्रह मंगळ आणि पृथ्वी यांच्यातील महत्वाचा दुवा म्हणून काम करेल. यामुळे मिशन कंट्रोल आणि रोवर-हेलीकॉप्टर यांच्याशी सतत संपर्क राखता येईल.

मंगळयान-2 हे भारतीयांसाठी अभिमानास्पद असून ते भारताला अंतरिक्ष शक्ती बनण्याच्या कक्षा विस्तारणार आहेत. ही मोहिम सगळ्यांच्या फायद्यासाठी अखंड वैज्ञानिक वृत्ती आणि अवकाशाचा शोध करण्याची भारताची जिज्ञासा जगासमोर आणते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyclone Montha: चक्रीवादळ 'मोंथा'मुळे देशभरातील हवामान बदलणार ; पुढील पाच दिवसांत 'या' राज्यांना पावसाचा इशारा!

मोठी बातमी! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; उमेदवारांना करता येईल २९ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत ‘या’ वेबसाईटवर अर्ज; एका पदासाठी एकाच अर्जाची अट

Montha Cyclone update : 'मोंथा' चक्रीवादळाचं थैमान सुरू! आंध्र प्रदेशात किनारपट्टी भागाला जोरदार तडाखा

Fake Acid Attack Case : धक्कादायक! दिल्लीत विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ल्याचं प्रकरण बनावट असल्याचे निष्पन्न!

दिवाळीपूर्वी मदत देण्याची घोषणा, तरी..! निम्मा सोलापूर जिल्हा अतिवृष्टीच्या मदतीपासून दूर; 3.95 लाख शेतकऱ्यांना मिळाली नाही भरपाई, तालुकानिहाय संख्या...

SCROLL FOR NEXT