Chandrayaan-3 eSakal
विज्ञान-तंत्र

Chandrayaan-3 : इस्रोच्या वैज्ञानिकांनी घेतले तिरुपती वेंकटचलपतिचे दर्शन; चांद्रयान मोहिमेच्या यशासाठी केली पूजा

१४ जुलै रोजी दुपारी चांद्रयानाचे प्रक्षेपण करण्यात येईल.

Sudesh

भारताची महत्त्वाकांक्षी चंद्रमोहीम असलेल्या चांद्रयान-३ चे लाँचिंग आता अवघ्या काही तासांवर आहे. १४ जुलै रोजी दुपारी या चांद्रयानाचे प्रक्षेपण करण्यात येईल. त्यापूर्वी आज इस्रोच्या वैज्ञानिकांनी या मोहिमेच्या यशासाठी तिरुपती वेंकटचलपति मंदिरात पूजा केली आहे.

छोटे मॉडेल नेले मंदिरात

भारताची अवकाश संशोधन संस्था इस्रोचे काही वैज्ञानिक आज सकाळी तिरुपती वेंकटचलपति मंदिरात पोहोचले. यावेळी त्यांनी आपल्यासोबत चांद्रयान-३ चे लहान मॉडेलही नेले होते. त्यांनी या मोहिमेच्या यशासाठी यावेळी पूजा केली.

चांद्रयान-३ मोहीम काय आहे?

चांद्रयान-३ ही भारताची महत्त्वाकांक्षी चंद्रमोहीम आहे. या माध्यमातून चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवण्यात येईल. चांद्रयान-२ च्या माध्यमातून हाच प्रयत्न इस्रोने केला होता. मात्र, सेफ लँडिंग न झाल्यामुळे ही मोहीम अयशस्वी ठरली होती. आता पुन्हा एकदा इस्रो यासाठी प्रयत्न करणार आहे.

रंगीत तालीम यशस्वी

मंगळवारी इस्रोने चांद्रयान-३ मोहीमेच्या तयारीची रंगीत तालीम पार पाडली. यामध्ये सर्व उपकरणे आणि केंद्रांची तयारी तपासण्यात आली. २४ तास चाललेली ही चाचणी यशस्वीपणे पार पडल्याची माहिती इस्रोच्या वैज्ञानिकांनी दिली होती.

कधी होणार लाँच?

१४ जुलै रोजी दुपारी २.३५ वाजता हे चांद्रयान अंतराळात झेप घेईल. आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथे असणाऱ्या सतीश धवन स्पेस सेंटरवरून हे लाँच करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT