Aditya L1 Launch eSakal
विज्ञान-तंत्र

Aditya L1 Launch : भारताची सूर्याकडे झेप! 'आदित्य एल-1'चं यशस्वी प्रक्षेपण; पाहा व्हिडिओ

ISRO Solar Mission : ही भारताची पहिली सौर मोहीम आहे.

Sudesh

चांद्रयान-3 मोहिमेच्या यशानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच इस्रोने आणखी एक मोठी कामगिरी पार पाडली आहे. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी 'आदित्य' उपग्रहाचे आज यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. सकाळी 11:50 मिनिटांनी पीएसएलव्ही रॉकेटच्या मदतीने हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला.

यानंतर काही दिवस आदित्य उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत राहणार आहे. त्यानंतर तो पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडून, अंतराळात असणाऱ्या एल-1 पॉइंटच्या दिशेने प्रवास सुरू करेल. याठिकाणी पोहोचण्यासाठी सुमारे चार महिन्यांचा कालावधी लागेल. त्यानंतर आदित्य उपग्रहाला एल-1 पॉइंटभोवती असणाऱ्या हेलो ऑर्बिटमध्ये प्रस्थापित करण्यात येईल.

सकाळी 11:50 वाजता प्रक्षेपित झाल्यानंतर काही मिनिटांमध्ये लाँचिंगचे तीन टप्पे यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले. यानंतर काही काळ पीएसएलव्ही रॉकेट हे ट्रॅकिंग रेंजच्या बाहेर गेलं होतं. यानंतर काही मिनिटांनी शिपबोर्न टर्मिनलचा वापर करून यानाला ट्रॅक करण्यात यश मिळालं. सुमारे 70 मिनिटांनी सर्व पाच टप्पे पार पाडून, 'आदित्य एल-1' हा उपग्रह पीएसएलव्ही रॉकेटपासून वेगळा झाला.

18 सप्टेंबरपर्यंत राहणार पृथ्वीच्या कक्षेत

आदित्य उपग्रह पीएसएलव्ही रॉकेटपासून वेगळा झाल्यानंतर काही दिवस तो पृथ्वीच्या कक्षेतच राहणार आहे. 18 सप्टेंबरनंतर तो पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडून L1 पॉइंटच्या दिशेने प्रवास सुरू करेल. आदित्यला आवश्यक तेवढी गती मिळण्यासाठी ही प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

यानंतर हा उपग्रह L1 या लॅग्रेंज पॉइंटच्या हेलो ऑर्बिटमध्ये स्थापन करण्यात येईल. याठिकाणी सूर्याचं आणि पृथ्वीचं गुरूत्वाकर्षण एकमेकांना बॅलन्स करत असल्यामुळे, ही जागा महत्त्वाची आहे. याठिकाणी एखाद्या उपग्रहाला कायम ठेवण्यासाठी अगदी कमी इंधनाची गरज भासते. त्यामुळे आदित्य उपग्रह याठिकाणी ठेवण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT