PM Modi esakal
विज्ञान-तंत्र

PM Modi : ISRO ला दुसऱ्या लाँचिंग सेंटरची गरज का भासली?; श्रीलंकेत रॉकेट घुसण्याची भीती अन्...

ISRO News : भारताला दुसऱ्या स्पेसपोर्टची गरज निर्माण झाली आहे. श्रीहरीकोटा येथून मोठ्या क्षमतेचं रॉकेट लाँच करण्यासाठी सर्व सज्जता आहेच, परंतु पीएसएलव्ही आणि ५०० किलोग्रॅम वजनाच्या उपग्रहांना तैनात करण्यासाठी...

संतोष कानडे

ISRO News : भारताला दुसऱ्या स्पेसपोर्टची गरज निर्माण झाली आहे. श्रीहरीकोटा येथून मोठ्या क्षमतेचं रॉकेट लाँच करण्यासाठी सर्व सज्जता आहेच, परंतु पीएसएलव्ही आणि ५०० किलोग्रॅम वजनाच्या उपग्रहांना तैनात करण्यासाठी डिझाईन केलेल्या 'एसएसएलव्ही'सारख्या लाँच वाहनांसाठी अडचणी निर्माण होत आहेत.

श्रीहरीकोटा येथून पोलर ऑर्बिटसाठी जेव्हा लाँचिंग केली जाते तेव्हा रॉकेटचा प्रक्षेपण मार्ग असा असतो की लाँच वाहनाला श्रीलंकेच्या आकाशात झेप घ्यावी लागते. त्यामुळे सुरक्षेच्या संबंधाने प्रश्न उपस्थित होतात. त्यामुळेच इस्रोला दुसऱ्या लाँचिंग सेंटरची गरज भासत आहे.

नवीन लाँचिंग सेंटरची गरज ओळखून लवकरच श्रीहरीकोटा येथील लाँचिंग सेंटरप्रमाणेच दुसरं स्पेसपोर्ट मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी तामिळनाडूच्या कुलशेखरपट्टनम् येथे भारताच्या दुसऱ्या स्पेसपोर्टची कोनशिला ठेवली.

प्रस्तावित असलेलं नवीन स्पेसपोर्ट श्रीहरीकोटातील 'इस्रो'पासून ७०० किलोमीटर दूर आहे. या सेंटरला छोट्या उपग्रहांना लो अर्थ ऑर्बिटमध्ये लाँच करण्यासाठी विकसित करण्यात येत आहे.

नवीन स्पेसपोर्टची गरज काय?

भारताकडून आपल्या अंतराळ मोहिमेचा विस्तार वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे. पायाभूत सुविधांसाठी देशाला अतिरिक्त प्रक्षेपणांची आवश्यकता आहे. विशेषतः कमी वजनाची रॉकेट ध्रुवीय कक्षेत पाठवण्यासाठी नवीन सेंटरची गरज आहे.

श्रीहरीकोटा येथून प्रक्षेपण करताना श्रीलंकेच्या अवकाशातून मार्ग आहे. त्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. नवीन लाँचिंग सेंटरमध्ये इंधनाचीही बचत होणार आहे. नवीन सेंटर किनारपट्टीच्या भागामध्ये असल्यामुळे प्रक्षेपण कामातील मलबा निवासी भागांवर पडणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या विमानाला आग!, प्रवाशी म्हणाले, 'असं वाटलं आज शेवटचा दिवस...', इंडिगो विमानात असं काय घडलं?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक अन् भारताच्या ऑलआऊट होऊनही २०० धावा पार; विंडीजसमोर किती धावांचं लक्ष्य?

MBBS Admission 2026: एमबीबीएस बीडीएस प्रवेश २०२६: प्रवेश निश्चित करण्यासाठी १४ ऑक्टोबरपर्यंत मुदत, ११ हजार ३४० विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

Parner Congress: पारनेर काँग्रेसमध्ये राजीनामासत्र! तालुकाध्यक्ष संभाजी रोहोकलेंसह संपूर्ण कार्यकारिणीचा राजीनामा, नेमकं काय कारण?

SCROLL FOR NEXT