ISRO Satellite Project eSakal
विज्ञान-तंत्र

ISRO Satellite Project : इस्रो अवकाशात सोडणार 50 उपग्रह; भारताच्या आजूबाजूला हजारो किलोमीटर क्षेत्रावर ठेवणार नजर

हजारो किलोमीटर क्षेत्राचे एचडी फोटो घेण्याची क्षमता या उपग्रहांमध्ये असेल. अवकाशातील विविध कक्षांमध्ये हे उपग्रह तैनात करण्यात येतील, असं सोमनाथ यांनी स्पष्ट केलं.

Sudesh

ISRO New Satellite Project : भारताची अवकाश संशोधन संस्था इस्रो ही सध्या एकापाठोपाठ एक मोठ्या प्रकल्पांवर काम करत आहे. इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी गुरुवारी सांगितलं की येत्या पाच वर्षांमध्ये देशाच्या सुरक्षेसाठी म्हणून इस्रो तब्बल 50 उपग्रह अवकाशात सोडणार आहे.

या उपग्रहांमुळे भारताच्या सीमा क्षेत्रासह चीन-पाकिस्तान, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावर लक्ष ठेवणं शक्य होणार आहे. हजारो किलोमीटर क्षेत्राचे एचडी फोटो घेण्याची क्षमता या उपग्रहांमध्ये असेल. अवकाशातील विविध कक्षांमध्ये हे उपग्रह तैनात करण्यात येतील, असंही सोमनाथ (S. Somnath) यांनी स्पष्ट केलं.

आयआयटी मुंबईचा वार्षिक विज्ञान आणि औद्योगिक सोहळा, म्हणजेच 'टेक फेस्ट'ला सोमनाथ यांनी हजेरी लावली होती. यावेळी बोलताना त्यांनी इस्रोच्या (ISRO) या मोहिमेबाबत माहिती दिली. ते म्हणाले की बदलांचं निरीक्षण करणं, आकडेवारीचं विश्लेषण करणं या गोष्टींसाठी एआयचा वापर करणं आवश्यक आहे. यासाठी उपग्रहांची क्षमता वाढवणं गरजेचं आहे. (ISRO to launch 50 Satellites)

भारताला एक मजबूत राष्ट्र बनवायचं असेल तर त्यासाठी सध्या उपलब्ध सॅटेलाईट्सचा ताफा (India Satellites) पुरेसा नाही. आजच्या तुलनेत आपल्याकडे दहा पट मोठ्या आकाराच्या ताफ्याची गरज आहे. येत्या पाच वर्षांमध्ये 50 उपग्रहांना पूर्ण करण्याची आमची योजना आहे. यासाठी उपग्रह असेंबल करण्यात आले आहेत. जे येत्या काही वर्षांमध्ये भारतात येतील, आणि प्रक्षेपित केले जातील. ही मोहीम पूर्ण झाल्यानंतर भारत संभाव्य धोक्यांना तोंड देण्यासाठी तत्पर असणार आहे; असं ते म्हणाले.

इस्रो सध्या जोमात

इस्रोने 2023 साली चांद्रयान-3 (Chandrayaan 3), आदित्य एल-1 (Aditya L1) यांसह आणखी कित्येक मोहिमा यशस्वीपणे पार पाडून दाखवल्या. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी इस्रो एक्सपोसॅट (XPoSat) मोहीम लाँच करणार आहे. तसंच, 6 किंवा 7 जानेवारी रोजी आदित्य यान देखील एल-1 पॉइंटवर पोहोचणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED Action against Anil Ambani : अनिल अंबानींवर ‘ED’ची मोठी कारवाई!, मुंबईतील अलीशान घर तात्पुरते जप्त

PCMC News : ‘स्थायी’च्या अध्यक्षपदासाठी अभिषेक बारणेंना संधी; एकमेव अर्ज दाखल; बिनविरोध निवड निश्चित, शनिवारी होणार शिक्कामोर्तब

Lung cancer in Mumbai : मुंबईत फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या ५७ टक्के रुग्णांमध्ये प्रदूषण हेच प्रमुख कारण!

SL vs NZ, T20 WC: न्यूझीलंडची उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल! श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात, जाता जाता पाकिस्तानची लावली वाट

Bride shot at wedding ceremony Video : विवाहमंडपात थरार! नववधूवर माथेफिरू प्रियकरानं सर्वांसमोरच झाडली गोळी

SCROLL FOR NEXT