ISRO Mission : भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपलं लँडर उतरवून नवा इतिहास नोंदवला आहे. हे यश अर्थातच भारताची अवकाश संशोधन संस्था इस्रोचं आहे. मात्र, या मोहिमेनंतर इस्रो आराम करणार नाही. उलट इस्रोने आपल्या पुढच्या मोहिमेची तयारी देखील सुरू केली आहे.
अगदी दूरदृष्टी विचार करून इस्रोने आपल्या पुढच्या योजना आखल्या आहेत. चांद्रयानाच्या माध्यमातून चंद्राच्या लपलेल्या भागाचा अभ्यास इस्रो करणार आहे. तर, सूर्याचा आणि शुक्र ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी देखील इस्रो उपग्रह पाठवणार आहे. सोबतच, मानवाला अंतराळात पाठवण्याची तयारी देखील इस्रोने सुरू केली आहे.
इस्रोने आपल्या 'आदित्य एल-1' या मोहिमेची तयारी आधीपासूनच सुरू केली आहे. या माध्यमातून इस्रो सूर्याचा अभ्यास करणार आहे. यासाठी आदित्य नावाचा हा उपग्रह पृथ्वीबाहेरील एल-1 या पॉइंटवर ठेवण्यात येईल. विशेष म्हणजे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातच याचं प्रक्षेपण होण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत भारताने एकही अंतराळवीर अवकाशात पाठवलेला नाही. यासाठीच, इस्रो गगनयान मोहिमेची तयारी करत आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यास स्वतः अवकाशात मानव पाठवणारा भारत जगातील चौथा देश ठरेल. ही मोहीम 2024 साली पार पाडण्याचं इस्रोचं लक्ष्य आहे.
पहिल्याच प्रयत्नात मंगळ मोहीम यशस्वी करणारं इस्रो आणखी एका मंगळ मोहिमेची तयारी करत आहे. सोबतच, शुक्र ग्रहासाठी देखील एक मोहीम राबवण्यात येणार आहे. अर्थात, या दोन्ही मोहिमांबद्दल सध्या अधिक माहिती उपलब्ध नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.