itel vision 3 smartphone with 18w fast charging under rupees 8000 launched check details rak94 
विज्ञान-तंत्र

8 हजारांत फास्ट चार्जिंग असलेला स्मार्टफोन, सोबत अनेक दमदार फीचर्स

सकाळ डिजिटल टीम

तुम्ही बजेटमध्ये चांगले फीचर्स असलेला फोन शोधत असाल तर, itel कंपनीने भारतात व्हिजन 3 (itel Vision 3) हा नवीन हँडसेट लॉन्च केला आहे, कंपनीचा हा लेटेस्ट स्मार्टफोन 3 GB रॅम आणि 64 GB इंटरनल स्टोरेजसह येतो. त्याची किंमत 7,999 रुपये आहे. फोनचे सर्वात मोठे फीचर म्हणजे हा देशातील पहिला स्मार्टफोन आहे जो 8 हजार रुपयांपेक्षा कमी मध्ये 18W फास्ट चार्जिंग ऑफर करतो.

या फोनची विक्री सुरू झाली आहे. तुम्ही तो Amazon India आणि Flipkart वरून खरेदी करू शकता. फोनची ऑफलाइन विक्री पुढील आठवड्यात सुरू होणार आहे. कंपनी फोनसोबत मोफत ब्लूटूथ हेडसेट देखील देत आहे. ही मर्यादित कालावधीची ऑफर आहे.

फीचर स्पेसिफिकेशन्स

कंपनी फोनमध्ये 6.6-इंचाचा HD + IPS वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले देत आहे. फोन 3 GB रॅम आणि 64 GB इंटरनल स्टोरेजने सुसज्ज आहे. Itel Vision 3 ऑक्टा-कोर प्रोसेसरवर काम करते. फोटोग्राफीसाठी कंपनी फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देत आहे.

यात 8-मेगापिक्सेल प्राथमिक कॅमेरासह VGA कॅमेरा दिला आहे. त्याच वेळी, कंपनी सेल्फीसाठी या फोनमध्ये 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देत आहे. फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस-अनलॉक फीचरने सुसज्ज असलेल्या या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे. ही बॅटरी AI पॉवर मास्टर आणि रिव्हर्स चार्जिंग सारख्या फीचर्ससह येते.

कंपनीने ज्वेल ब्लू, मल्टी कलर ग्रीन आणि डीप ओशन ब्लॅकमध्ये हा 4G फोन लॉन्च केला आहे. OS बद्दल बोलायचे झाले तर, Itel चा हा नवीन फोन Android 11 सह येतो. कंपनी एका विशेष योजनेसह फोन ऑफर करत आहे, ज्या अंतर्गत वापरकर्त्यांना खरेदी केल्यापासून 100 दिवसांपर्यंत एक-वेळ फ्री स्क्रीन बदलण्याची सुविधा मिळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT