Japan Moon Mission SLIM eSakal
विज्ञान-तंत्र

Japan Moon Mission : जपानची चंद्राकडे झेप! पहाटेच लाँच केलं रॉकेट; पाठवलं लँडर आणि एक्स-रे टेलिस्कोप

SLIM Mission : जपानच्या या चांद्र मोहिमेचं नाव SLIM असं ठेवण्यात आलं आहे.

Sudesh

भारताने काही दिवसांपूर्वीच चांद्रयान-3 मोहीम यशस्वीपणे पार पाडली. यानंतर आता जपानने देखील आपली चांद्रमोहीम लाँच केली आहे. भारतीय वेळेनुसार आज पहाटे 5:12 वाजता H2-A रॉकेटसोबत जपानने दोन अंतराळ यान लाँच केले. या मोहिमेचं नाव SLIM असं ठेवण्यात आलं आहे.

जपानने चंद्रावर एक एक्स-रे टेलिस्कोप आणि एक छोटं लँडर पाठवलं आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यास चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा जपान पाचवा देश ठरेल. पहाटे लाँच झाल्यानंतर दोन टप्प्यांमध्ये टेलिस्कोप आणि लँडर रॉकेटपासून वेगळे झाले. आता या दोघांना चंद्रावर पोहोचण्यासाठी सुमारे चार ते सहा महिन्यांचा वेळ लागणार आहे.

H2-A रॉकेट हे जपानचं सर्वात विश्वासार्ह रॉकेट आहे. जपानची अंतराळ संशोधन संस्था JAXA ने यापूर्वी 42 उड्डाणांमध्ये याचा वापर केला होता. यापैकी 41 उड्डाणे यशस्वी होती. यानंतर आजचं उड्डाण देखील यशस्वीपणे पार पाडून या रॉकेटने आपली कामगिरी कायम ठेवली आहे.

जपानच्या चांद्र मोहिमेची तयारी गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू आहे. मात्र, काही ना काही कारणांमुळे हे प्रक्षेपण पुढे ढकललं जात होतं. यापूर्वी 25 ऑगस्ट रोजी याचं प्रक्षेपण होणार होतं, मात्र हवामान योग्य नसल्यामुळे ते पुढे ढकलण्यात आलं. जपानने यापूर्वीही चंद्रावर सॉफ्ट लँडिंगचा अयशस्वी प्रयत्न केला आहे.

जपान या मोहिमेत चंद्रावर एक 'एक्स-रे इमेजिंग अँड स्पेक्ट्रोस्कोपी मिशन' म्हणजेच XRISM नावाचा टेलिस्कोप पाठवणार आहे. सोबतच 'स्मार्ट लँडर फॉर इन्व्हेस्टिंग मून' (SLIM) हे छोटंसं लँडर देखील पाठवेल. हे लँडर अगदी कमी जागेत चंद्रावर उतरणार आहे. त्यामुळेच याला 'स्नायपर' असंही म्हटलं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेपाळमध्ये पुन्हा हाहाकार! गंडकी नदीला अचानक पूर, घरं-पूल गेले वाहून; पहाटे नागरिकांचे स्थलांतर, बचावकार्य सुरू

IND vs NZ ODI Series: भारताविरुद्ध वनडे मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर! ‘या’ खेळाडूंचं पुनरागमन, पाहा संपूर्ण स्क्वॉड

Maharashtra Live News : सीजेपी नेते कपिल सिब्बल यांच्या भेटीला

कॅन्सरशी लढताना मनीषा कोईराला ठरली आधार! सोनाली बेंद्रेने केला मोठा खुलासा, म्हणाली...

Farmers Success: थेंबाथेंबातून फुलविली द्राक्षबाग;अंबेजवळगे येथील सुनीता बिरंजे यांचा जलव्यवस्थापनाचा आदर्श

SCROLL FOR NEXT