Japan Moon Mission JAXA SLIM eSakal
विज्ञान-तंत्र

Japan Moon Mission : जपानला चंद्रावर पोहोचण्यासाठी लागणार सहा महिन्यांचा वेळ; काय आहे कारण?

JAXA SLIM Launch : आज (7 सप्टेंबर) पहाटेच जपानने आपलं रॉकेट लाँच केलं.

Sudesh

भारताने काही दिवसांपूर्वीच चांद्रयान-3 मोहीम यशस्वी केली होती. यानंतर आता जपानने देखील चंद्राच्या दिशेने आपलं लँडर पाठवलं आहे. आज (7 सप्टेंबर) पहाटेच जपानने आपलं रॉकेट लाँच केलं. यामधून एक लँडर आणि एक एक्स-रे इमेजिंग टेलिस्कोप चंद्रावर पाठवण्यात येत आहे.

जपानी अंतराळ संस्था JAXA ने आज या मोहिमेचं यशस्वी प्रक्षेपण केलं. तांगेशिमा स्पेस सेंटरच्या योशीनोबू लाँच कॉम्प्लेक्समधून H-2A हे रॉकेट लाँच करण्यात आलं. या माध्यमातून जपान चंद्राचा आणखी अभ्यास करणार आहे. सोबतच ते चंद्रावर सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न देखील करणार आहे.

जपान चंद्रावर लँड करण्यासाठी SLIM हे लँडर पाठवत आहे. हे लँडर नावाप्रमाणेच छोटंसं आहे. याला चंद्रावर उतरवण्यासाठी देखील अगदी कमी जागेची निवड करण्यात आली आहे. चंद्रावर अवघ्या 100 मीटर जागेत हे लँड होईल. यामुळेच या मिशनला 'मून स्नायपर' असंही म्हटलं जात आहे.

सहा महिने करणार प्रवास

हे लँडर चंद्रावर पोहोचण्यासाठी तब्बल सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे. जपानी अंतराळ संस्थेचे अध्यक्ष हिरोशी यामाकावा यांनी याचं कारण स्पष्ट केलं. जास्तीत जास्त इंधनाची बचत करण्यासाठी जपान अगदी आरामात हे लँडर चंद्रावर पाठवत आहे.

याचं दुसरं कारण म्हणजे, SLIM हे अगदी छोटं लँडर असल्यामुळे यात कमी प्रमाणात इंधन नेता येऊ शकतं. त्यामुळेही जपान पृथ्वीच्या आणि चंद्राच्या गुरुत्वाकर्षण बलाचा अधिक वापर करून, अगदी हळू-हळू हे यान चंद्रावर नेणार आहे. साधारणपणे फेब्रुवारीमध्ये हे लँडर चंद्रावर उतरेल. ही मोहीम यशस्वी झाल्यास चंद्रावर उतरणारा जपान पाचवा देश ठरणार आहे.

इस्रोने दिल्या शुभेच्छा

जपानने आज या लँडर आणि टेलिस्कोपचे प्रक्षेपण केल्यानंतर, भारताची अवकाश संशोधन संस्था इस्रोनेही जपानचं अभिनंदन केलं आहे. 'SLIM लँडरच्या यशस्वी प्रक्षेपणासाठी JAXAचे अभिनंदन. ग्लोबल स्पेस कम्युनिटीच्या या आणखी एका चांद्र मोहिमेच्या यशासाठी खूप शुभेच्छा' असं इस्रोने आपल्या एक्स (ट्विटर) पोस्टमध्ये म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

Igatpuri Tunnel Latest Update : समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! इगतपुरी बोगदा 'या' वेळेत बंद राहणार, काय आहे कारण?

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

SCROLL FOR NEXT