AI Restriction eSakal
विज्ञान-तंत्र

AI Regulation : जपानच्या पंतप्रधानांनी सादर केला ‘एआय’वर नियंत्रणासाठी आराखडा; पहिलाच जागतिक प्रयत्न

पॅरिसमधील आर्थिक सहकार्य आणि विकास संघटनेने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात किशिदा यांनी या आराखड्याची घोषणा केली.

सकाळ वृत्तसंस्था

AI Regulation Map : जपानचे पंतप्रधान फ्युमिओ किशिदा (Fumio Kishida) यांच्या हस्ते आज ‘जनरेटिव्ह एआय’चा वापर आणि नियमन करण्याबाबतच्या आंतरराष्ट्रीय आराखड्याचे उद्‌घाटन करण्यात आले. अत्यंत वेगाने विस्तारणाऱ्या या तंत्रज्ञानावर नियंत्रण ठेवण्यासाठीचा हा पहिला जागतिक प्रयत्न मानला जात आहे.

पॅरिसमधील आर्थिक सहकार्य आणि विकास संघटनेने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात किशिदा यांनी या आराखड्याची घोषणा केली. यावेळी किशिदा म्हणाले, ‘‘जगाला आणखी समृद्ध करण्याची क्षमता ‘जनरेटिव्ह एआय’मध्ये आहे. मात्र, याच तंत्रज्ञानाद्वारे चुकीची माहितीही पसरविली जाण्याची शक्यता असून ती याची काळी बाजू आहे.’’ (Generative AI)

‘एआय’वर नियंत्रण ठेवण्याच्या मुद्द्याकडे जगाचे लक्ष वेधून घेण्यासाठी जपानने मागील वर्षी ‘हिरोशिमा एआय प्रोसेस’ची घोषणा केली होती. याद्वारे ‘एआय’चा विकास करणाऱ्या कंपन्यांसाठी आचारसंहिता आणि मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्याची मागणी करण्यात आली होती. कोणावरही बंधनकारक नसलेल्या या आराखड्यास ४९ देशांनी मान्यता देऊन तो स्वीकारला होता. आता त्याचा पुढील टप्पा म्हणून आंतरराष्ट्रीय आराखडा जाहीर करण्यात आला आहे. या आराखड्यातील तरतुदी लवकरच प्रसिद्ध केल्या जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

‘एआय’वर कोणाचे नियंत्रण असावे? (आकडे टक्क्यांमध्ये)

AI Restriction Plan

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Release : कोयना धरणातुन पाण्याचा विसर्ग वाढवला; १५ हजार ५८ क्युसेक पाण्याचा विसर्ग, धरणाचे दरवाजे दोन फुटावर

Marathi News Live Updates : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मोठी घोषणा, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू स्थापन करणार नवा राजकीय पक्ष

भारत-पाकिस्तानमध्ये तणाव पुन्हा वाढला; शहबाज शरीफांचा भारताला थेट इशारा, उमर अब्दुल्लांनीही पाकला सुनावलं

Kalamb News : नासा अंतराळ संशोधन केंद्र अभ्यास दौरा भेटीसाठी कळंब तालुक्यातील तीन विद्यार्थ्यांची निवड

Independence Day Wishes in Marathi: "झंडा ऊँचा रहे हमारा..." स्वातंत्र्यदिनानिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या खास मराठी शुभेच्छा आणि देशभक्तीपर संदेश!

SCROLL FOR NEXT