Wireless Charging Car eSakal
विज्ञान-तंत्र

EV Charging : सिग्नलवर पोहोचताच चार्ज होणार इलेक्ट्रिक कार; थांबण्याचीही गरज नाही! 'वायरलेस चार्जिंग'चा पायलट प्रोजेक्ट सुरू

Wireless Charging Car : टोकियो युनिवर्सिटीने एक इन-मोशन इलेक्ट्रिसिटी सप्लाय सिस्टीम तयार केली आहे.

Sudesh

सध्या तंत्रज्ञान अगदी वेगाने प्रगती करत आहे. काही वर्षांपूर्वीच अगदी नवीन असणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स आता अगदी सामान्य बाब झाली आहे. मात्र, तरीही चार्जिंग स्टेशन शोधणे आणि तिथे गाडी चार्जिंगला लावून ठेवणे कंटाळवाणे वाटत असल्यामुळे कित्येक लोक याकडे पाठ फिरवतात. मात्र, आता आपल्या स्मार्टफोन प्रमाणेच चक्क कारसाठी देखील 'वायरलेस चार्जिंग' सुविधा उपलब्ध होणार आहे.

अशा प्रकारच्या चार्जिंगचा पायलट प्रोजेक्ट जपानमध्ये सुरू झाला आहे. जपानची राजधानी टोकियोजवळ असणाऱ्या काशिवा-नो-हा नावाच्या एका शहरात हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. ब्रिजस्टोन ही टायर कंपनी, ऑटो पार्ट्स बनवणारी एनएसके अँड डेन्सो कंपनी, टोकियो युनिवर्सिटी, चिबा युनिवर्सिटी आणि आणखी नऊ कंपन्या मिळून हा प्रकल्प राबवत आहेत.

कशी होणार कार चार्ज?

टोकियो युनिवर्सिटीने एक इन-मोशन इलेक्ट्रिसिटी सप्लाय सिस्टीम तयार केली आहे. यामुळे एखादी गोष्ट वायरलेस पद्दतीने चार्ज करण्यासाठी ती ठराविक ठिकाणी स्थिर ठेवण्याची गरज नाही. याचा वापर सिग्नलवर करण्यात येणार आहे. ट्रॅफिक सिग्नलच्या खाली असलेल्या रस्त्यावर प्रीकास्ट चार्जिंग कॉईल्स बसवण्यात येतील.

या कॉईल्सवरुन एखादी इलेक्ट्रिक कार जाताच, यातून करंट पास होईल. हा करंट कॅच करण्यासाठी गाड्यांच्या चाकांमध्ये विशिष्ट प्रकारचं उपकरण बसवण्यात येईल. हे उपकरण चार्जिंग कॉइलमधील करंट शोषून घेत ते वरती बॅटरीकडे पाठवेल.

इन-मोशन इलेक्ट्रिसिटी सप्लाय सिस्टीममुळे वाहनांची गती अगदी हळू वेगाने गेली तरी ती चार्ज होऊ शकणार आहे. ट्रॅफिक सिग्नलवर वाहनांचा वेग कमी असतो, किंवा काही वेळ वाहन तिथेच थांबलेले असते. त्यामुळेच याठिकाणी हे चार्जर लावण्यात आले आहेत. शहरातील ठराविक सिग्नलवर ही सिस्टीम सुरू करण्यात आली आहे. पॉझिटिव्ह फीडबॅक मिळाल्यास अशा सिग्नलची संख्या वाढवण्यात येईल.

किती होणार चार्जिंग?

मीडिया रिपोर्ट्समध्ये मिळालेल्या माहितीनुसार, या कॉईल्स जवळून सुमारे 10 सेकंद एखादी गाडी गेल्यास; ती सुमारे 1 किलोमीटर प्रवास करण्याइतपत चार्ज होईल. यापेक्षा जास्त वेळ थांबल्यास अर्थातच बॅटरी जास्त चार्ज होणार आहे. सुमारे एक मिनिट कार याठिकाणी थांबल्यास 6 किलोमीटर एवढी रेंज मिळणार आहे.

एखाद्या मोठ्या शहरात 6 किलोमीटर अंतराच्या आत दोन ते तीन सिग्नल नक्कीच असतात. त्यामुळे आपल्या इच्छित ठिकाणी पोहोचेपर्यंत पुरेसे चार्जिंग उपलब्ध करून देणं नक्कीच शक्य होणार आहे.

मार्चपर्यंत होणार चाचणी

टोकियो युनिवर्सिटीने दिलेल्या माहितीनुसार, 10 मार्च 2024 पर्यंत ही चाचणी पार पडणार आहे. यानंतर मिळालेल्या निष्कर्षांमधून याचा सामान्य वापर करायचा की नाही त्याबाबत निर्णय घेतला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

Latest Maharashtra News Updates : उद्या ठाकरेंचा विजयी मेळावा- वरळी डोममध्ये तयारी सुरु

ST Pass : एकाच महिन्यात 5 लाख विद्यार्थ्यांना शाळेत मिळाले एसटी पास; कोणाला मिळतो सवलतीचा पास? वाचा...

Indian Women Cricket Team: भारतीय महिला संघ आज रचणार इतिहास; T20 मालिका जिंकण्याची संधी

"निलेश तू कसा आहेस माहितीये..." साबळेंच्या व्हायरल व्हिडिओनंतर मराठी अभिनेता झाला व्यक्त ; म्हणाला..

SCROLL FOR NEXT