Alien Message eSakal
विज्ञान-तंत्र

Alien Message : एलियन्स खरंच आहेत? जपानी प्राध्यापकाने 40 वर्षांपूर्वी पाठवला होता संदेश; आता अंतराळातून येणार उत्तर

Cosmic Signals : अंतराळातून येणारे कॉस्मिक संदेश रिसीव्ह करण्यासाठी जपानमध्ये मोठा अँटीना बसवण्यात येतो आहे.

Sudesh

या विश्वामध्ये पृथ्वी सोडून इतर ग्रहांवर देखील जीवन असल्याची शक्यता कोणीही नाकारत नाही. त्यामुळेच परग्रहवासियांचा शोध घेण्यासाठी वैज्ञानिकांचा सातत्याने प्रयत्न सुरू असतो. या एलियन्ससाठी आतापर्यंत अंतराळात कित्येक संदेश पाठवण्यात आले आहेत.

यातीलच एका संदेशाला आता उत्तर मिळण्याची शक्यता आहे. जपानी प्राध्यापक आणि रिसर्चर मसाकी मोरिमोटो आणि हिसाशी हीराबायशी यांनी 1983 साली अंतराळात काही रेडिओ संदेश पाठवले होते. या संदेशांना आता उत्तर येण्याची शक्यता आहे. यामुळेच असे संदेश रिसीव्ह करण्यासाठी जपानमध्ये मोठा अँटीना बसवण्यात येतो आहे.

काय होता संदेश?

15 ऑगस्ट 1983 साली हा संदेश पाठवण्यात आला होता. "हॅलो, तिकडे कोणी आहे का?" असं या संदेशामध्ये म्हटलं होतं. हा संदेश पाठवणारे वैज्ञानिक मासाकी यांचं 2010 साली निधन झालं. मात्र, त्यांच्या टीममध्ये असणारे शिन्या नरुसावा यांना या संदेशाचं उत्तर येईल अशी आशा आहे. त्यामुळेच याबाबत तयारी सुरू करण्यात आली आहे. (Japan Alien Message)

अल्टेयर ग्रहावरुन उत्तराची आशा

पृथ्वीपासून 16.7 प्रकाशवर्षे दूर असणाऱ्या अल्टेयर ग्रहावरून हे उत्तर येण्याची आशा शिन्या यांनी व्यक्त केली. या ग्रहावर जीवसृष्टीची सगळ्यात जास्त शक्यता असल्याचं यापूर्वी कित्येक संशोधनांमध्ये म्हटलं गेलं आहे. पृथ्वीपासून या ग्रहावर संदेश पोहोचण्यासाठी लागणारा वेळ, आणि तेथून पुन्हा उत्तर येण्यासाठी लागणारा अंदाजित वेळ लक्षात घेता; आता सिग्नल कॅच करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. (Aliens)

आज सुरू होणार अँटीना

जपान एअरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सीने (JAXA) दिलेल्या माहितीनुसार, देशाच्या साकू प्रांतामध्ये या संदेश लहरी कॅच करणारा अँटीना बसवण्यात येणार आहे. भारतीय वेळेनुसार मंगळवारी (22 ऑगस्ट) संध्याकाळी 6.30 वाजता हा अँटीना सुरू करण्यात येईल.

जपानसाठी मोठा दिवस

जपानसाठी हा दिवस अगदी महत्त्वाचा आहे. जपानी कॅलेंडरनुसार, वर्षाच्या सातव्या महिन्याच्या सातव्या दिवशी तानाबाता फेस्टिवल साजरं केलं जातं. या दिवशी संपूर्ण जपानमधील लोक ठिकठिकाणी एकत्र येत, लहान लहान आकाशकंदील हवेत सोडतात. या फेस्टिवलला स्टार फेस्टिवल देखील म्हटलं जातं. आजच जपानमध्ये हे फेस्टिवल साजरे होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT