Jio Yearly Recharge Plan : भारताची आघाडीची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी एक अत्यंत आकर्षक आणि बजेटमध्ये बसणारी योजना सादर केली आहे. फक्त ८९५ रुपयांमध्ये मिळणार आहे तब्बल ११ महिन्यांची वैधता असलेला हा रिचार्ज प्लॅन आहे.
या योजनेतील सर्वात मोठी आकर्षण बाब म्हणजे खर्च. हा प्लॅन एका महिन्यासाठी सरासरी ८० रुपये इतक्या कमी किमतीत आहे जो सध्याच्या टेलिकॉम मार्केटमधील सर्वात स्वस्त योजनेपैकी एक आहे. त्यामुळे कमी खर्चात जास्त सुविधा मिळवू इच्छिणाऱ्या वापरकर्त्यांसाठी ही योजना वरदान ठरणार आहे.
किंमत: 895 रुपये
वैधता: 336 दिवस (11 महिने)
कॉलिंग: कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉल
डेटा: दर महिन्याला 2GB, एकूण 24GB फास्ट डेटा
SMS: दर महिन्याला 50 SMS कोणत्याही नेटवर्कवर
ही योजना केवळ JioPhone किंवा Jio Bharat Phone वापरकर्त्यांसाठीच लागू आहे. स्मार्टफोन वापरकर्त्यांना ही योजना वापरता येणार नाही. मात्र ज्यांना महिन्या महिन्याला रिचार्ज करण्याचा त्रास नको आहे ज्यांचा डेटा वापर कमी आहे किंवा मुख्यतः कॉलिंगवर भर असतो अशा वापरकर्त्यांसाठी ही योजना एकदम योग्य आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक किंवा बजेटमध्ये राहणाऱ्या ग्राहकांसाठी हा उत्तम पर्याय ठरू शकतो.
जिओची ही योजना फक्त ग्राहकांना फायदेशीर ठरणार नाही, तर एअरटेलसारख्या प्रतिस्पर्ध्यांवरही दबाव टाकणार आहे. जास्त दिवसांच्या आणि किफायतशीर रिचार्ज प्लॅनमध्ये जिओने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
जर तुम्ही जिओफोन किंवा भारत फोन वापरत असाल आणि वारंवार रिचार्ज न करता दीर्घकाळ सेवा घेण्याचा विचार करत असाल तर ही योजना तुमच्यासाठी एकदम परफेक्ट ठरू शकते. कमी खर्चात तब्बल 11 महिने कॉल, डेटा आणि SMS यांचा लाभ घेता येईल तेही कुठलाही अॅडिशनल खर्च न करता!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.