Jio 999 New Recharge Plan esakal
विज्ञान-तंत्र

Jio New Recharge Plan : जिओ युजर्ससाठी खुशखबर! 98 दिवस फ्री कॉल, रोज 2GB डेटा अन् OTT मनोरंजनाचा धमाका, रिचार्जची किंमत फक्त..

Jio 999 New Recharge Plan : रिलायन्स जिओने ९८ दिवसांसाठी खास प्रीपेड प्लान आणला आहे. याची सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर..

Saisimran Ghashi

Jio Recharge Plans : देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांसाठी सतत नवनवीन आणि परवडणारे रिचार्ज प्लान्स घेऊन येत आहे. आता जिओने एक जबरदस्त प्रीपेड प्लॅन सादर केला असून, तो ग्राहकांमध्ये चांगलाच लोकप्रिय ठरतो आहे. 999 रुपयांच्या या प्लानमध्ये तब्बल 98 दिवसांची वैधता, अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 2GB डेटा, ओटीटी सबस्क्रिप्शन, आणि बरेच काही मिळते. तेही कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय!

जिओचा 999 रुपयांचा धमाल प्लॅन

रिलायन्स जिओचा हा प्रीपेड प्लॅन खासकरून जास्त दिवसांसाठी आणि हेवी डेटा वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी डिझाईन करण्यात आला आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला मिळतात-

  • 98 दिवसांची वैधता

  • प्रत्येक दिवसासाठी 2GB डेटा (एकूण 196GB डेटा)

  • अनलिमिटेड कॉलिंग

  • दररोज 100 एसएमएस मोफत

  • अनलिमिटेड 5G डेटा

ओटीटी प्रेमींसाठी खास ऑफर

हा प्लॅन केवळ डेटा आणि कॉलिंगपर्यंत मर्यादित नसून, मनोरंजनाच्या क्षेत्रातही भरघोस फायदा देतो.

  • 90 दिवसांची JioCinema Hotstar (मोबाईल) सबस्क्रिप्शन

  • फ्री Jio TV सबस्क्रिप्शन – Zee5, SonyLIV यांसारख्या लोकप्रिय प्लॅटफॉर्म्सचा ऍक्सेस जिओ टीव्ही अ‍ॅपद्वारे मिळतो

1049 रुपयांचा प्रीमियम प्लॅन

जर तुम्हाला अजून थोडा अपग्रेड हवा असेल, तर जिओचा 1049 रुपयांचा प्लॅन देखील उत्तम पर्याय ठरू शकतो. या प्लॅनमध्येही अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 2GB डेटा (84 दिवस) आणि Hotstar सबस्क्रिप्शन मिळते. याशिवाय, 50GB जिओ एआय क्लाऊड स्टोरेज आणि ZEE5, SonyLIV ची अ‍ॅक्सेसही मिळते.

जर वापरकर्त्यांनी आपली दैनिक डेटा मर्यादा पार केली, तर इंटरनेटचा वेग 64 Kbps पर्यंत कमी होतो. मात्र कॉलिंग आणि एसएमएसवर त्याचा परिणाम होत नाही.

थोडक्यात, जिओचा हा 999 रुपयांचा प्लॅन म्हणजे प्रीपेड युजर्ससाठी एकदम फायदेशीर डील आहे. कॉलिंग, डेटा, ओटीटी सबस्क्रिप्शन आणि जास्त दिवसांची वैधता हे सगळं एका प्लॅनमध्ये मिळतंय, तेही परवडणाऱ्या किमतीत. जिओच्या या नव्या प्लॅनमुळे इतर टेलिकॉम कंपन्यांनाही स्पर्धेत राहण्यासाठी नवे पर्याय शोधावे लागतील, हे निश्चित!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT