Jio AirFiber eSakal
विज्ञान-तंत्र

Jio AirFiber : 100 हून अधिक शहरांमध्ये सुरू झाली जिओ एअर फायबरची सेवा; तुमच्या शहरात आहे का? असं तपासा

Jio Air Fiber Plans : सप्टेंबर महिन्यात कंपनीने नवीन Air Fiber डिव्हाईस लाँच केले होते.

Sudesh

काही दिवसांपूर्वी जिओने आपली नवी एअर फायबर सेवा लाँच केली होती. वेगवान आणि वायरलेस इंटरनेट सेवा पुरवण्यासाठी जिओने नवीन डिव्हाईस लाँच केलं होतं. ही सेवा सुरुवातीला केवळ ठराविक शहरांमध्ये उपलब्ध होती. मात्र, आता देशातील 115 शहरांमध्ये Jio Air Fiber सेवा उपलब्ध करण्यात आली आहे.

सप्टेंबर महिन्यात कंपनीने नवीन Air Fiber डिव्हाईस लाँच केले होते. सुरुवातीला केवळ 8 शहरांमध्ये ही सेवा उपलब्ध होती. यामध्ये कंपनी जास्तीत जास्त 1.5 Gbps एवढ्या स्पीडने इंटरनेट देत आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन किंवा कस्टमर केअरला कॉल करुन तुम्ही एअर फायबर बुक करू शकता.

तुमच्या शहरात आहे का?

तुमच्या शहरात एअर फायबर सुरू झालं आहे का हे तपासण्यासाठी तुम्हाला जिओच्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल. यानंतर सर्च ऑप्शनमध्ये आपल्या शहराचं नाव एंटर करुन तुम्ही ही गोष्ट तपासू शकता. (Tech News)

एअर फायबरचे प्लॅन्स

जिओ कंपनीने एअर फायबरचे दोन प्लॅन्स लाँच केले आहेत. Air Fiber आणि Air Fiber MAX असे दोन प्लॅन्स उपलब्ध आहेत. कंपनीने सहा महिने आणि 12 महिने व्हॅलिडिटीसोबत हे दोन प्लॅन्स लाँच केले आहेत. सहा महिन्यांची व्हॅलिडिटी असणाऱ्या प्लॅनसोबत 1000 रुपये इन्स्टॉलेशन फी द्यावी लागणार आहे. 12 महिन्यांच्या प्लॅनवर इन्स्टॉलेशन मोफत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Praful Hinge? वैभव-यशस्वीला रोखण्यासाठी SRH ने विदर्भच्या पोट्ट्याला पदार्पणाची दिली संधी; जाणून घ्या त्याची प्रेरणादायी कहाणी

India Monsoon Update 2026 : यंदा ‘एल निनो’ मुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मान्सूनबाबत चिंताजनक अंदाज

Sangamner Concert: संगमनेरकरांची अजरामर आठवण; बाळासाहेब थोरात-आशा भोसले यांचे जिव्हाळ्याचे नाते, कॉन्सर्टमुळे मनात कायम घर!

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय! महायुती सरकारचे तब्बल ₹१२,२४० कोटी रुपये वाचणार; योजनेत मोठा टर्निंग पॉइंट

SCROLL FOR NEXT