Jio vs Airtel Best Value 5G Prepaid Plans esakal
विज्ञान-तंत्र

5G Recharge Plan : 5G नेटवर्कच्या युद्धात जिओ अन् एअरटेलपैकी तुमच्यासाठी कोणते बेस्ट?

Jio-Airtel Recharge Plans : जिओ आणि एयरटेल या दोन्ही दिग्गज कंपन्या 5G सेवा देत असून त्यांच्या स्वस्तातल्या 5G पॅकमध्ये काय फरक आहे ते जाणून घ्या.

Saisimran Ghashi

5G Network Recharge : मोबाईल कंपन्यांनी केलेल्या दरावाढीनंतर 5G डाटा पॅक खरेदी करण्याचा विचार करत आहात? जियो आणि एयरटेल या दोन्ही दिग्गज कंपन्या 5G सेवा देत असून त्यांच्या स्वस्तातल्या 5G पॅकमध्ये काय फरक आहे ते जाणून घ्या.

Jio धमाकेदार डील

Jio चा सर्वात स्वस्तात 5G प्लॅन रु. 349 इतका आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला 1 महिन्याची वैधता आणि 60GB डाटा (2GB दैनिक) मिळतो. यासोबतच अनलिमिटेड कॉल आणि 100 SMS प्रतिदिन मिळतात. Jio च्या या प्लॅनमध्ये JioTV, JioCinema आणि JioCloud ची सब्सक्रिप्शनही समाविष्ट आहे.

Airtel डाटा पॉवर

Airtel चा 5G प्लॅन थोडा महाग ( रु. 379) आहे पण तो जास्त डाटा देतो. या प्लॅनमध्ये 1 महिन्याची वैधता आणि 263GB डाटा (8.5GB दैनिक) मिळतो. यासोबतच अनलिमिटेड कॉल, 100 SMS आणि मोफत हेलोट्यून मिळते. यात एअरटेलच्या Wynk Music ची सब्सक्रिप्शनही आहे. या प्लॅनमध्ये 5G नेटवर्क असलेल्या भागात प्लॅनच्या डाटा लिमिट संपल्यानंतरही अनलिमिटेड 5G डाटा मिळतो.

तुमच्यासाठी कोणते बेस्ट?

जिओची योजना स्वस्तात असली तरी डाटा कमी आहे. मात्र, जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊडसारखे अॅप्स वापरण्याची सुविधा मिळते. दुसरीकडे, एयरटेलची योजना थोडी महाग असली तरी जास्त डाटा आणि इतर फायदे मिळतात. त्यामुळे तुमच्या गरजेनुसार आणि वापरानुसार निवड करू शकता.

जिओ आणि एअरटेल दोन्ही टेलीकॉम कंपन्यांनी 3 जुलैपासून त्यांच्या रीचार्ज दरांमध्ये वाढ केली होती.ग्राहक वर्ग मात्र या दरवाढीमुळे मोठ्या प्रमाणात नाराज होते कारण एअरटेलने रिचार्ज दरांमध्ये वाढ केल्यानंतर ती वाढ फार कमी रुपयांची होती. अगदी किरकोळ दरांमध्ये वाढ करण्यात आली होती.परंतु जिओने रिचार्जच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणावर दरवाढ केली होती त्यामध्ये काही रिचार्ज प्लॅनचे दर दुप्पट करण्यात आले होते.

त्याचबरोबर 5G वापरकर्त्यांना देखील मोठा धक्का बसला होता कारण पाहिजे वर आता वेगळा दर आकारला जाणार आहे त्यामुळे ग्राहक वर्गातून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात होती. अशाप्रकारे जिओ आणि एअरटेल वापरकर्त्यांवर या दरवाढीचा मोठा परिणाम दिसून आला आहे. आम्ही सांगितलेल्या रिचार्ज प्लॅनपैकी तुमच्या सोयीनुसार आणि आवडीनिवडीनुसार तुम्ही एक रिचार्ज प्लॅन निवडू शकता त्याचबरोबर अधिक माहितीसाठी जिओ आणि एअरटेल वेबसाईट किंवा ॲपला भेट देऊन त्यांचे नवनवीन प्लॅन जाणून घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Patna Road Accident : गंगा नदीत स्नानासाठी जाताना काळाचा घाला! ट्रक-ऑटोच्या भीषण धडकेत 7 महिला जागीच ठार; 4 जणांची प्रकृती गंभीर

स्टार प्रवाहसाठी मालिका नव्हे प्रोडक्शन हाउस महत्वाचं; प्राइम टाइमसाठी टॉप ५ मधली मालिका करणार बंद, नेटकरी म्हणतात- आताच तर...

Marbat 2025: सगळं अशुभ,अमंगळ घेऊन जा..गे मारबत! कोण होत्या राणी बाकाबाई भोसले ज्यांच्यामुळे नागपुरात सुरू झाला अनोखा मारबत?

खुशखबर! Oneplus 13 स्मार्टफोनचा दर उतरला; मिळतोय हजारो रुपयांचा डिस्काउंट; 24GB रॅमचा मोबाईल किंमत फक्त...

Asia Cup 2025: श्रेयस अय्यरला टीम इंडियात संधी मिळाली असती, पण कोणाचा 'हट्ट' नडला? इतर संघांपेक्षा वेगळं करण्यासाठी गेले अन्...

SCROLL FOR NEXT