Jio Sakal
विज्ञान-तंत्र

Broadband Plans: Jio ची भन्नाट ऑफर, २०० रुपये अतिरिक्त द्या अन् मोफत मिळवा तब्बल १४ OTT चे सबस्क्रिप्शन

जिओकडे अवघ्या ८९९ रुपये किंमतीचा शानदार ब्रॉडब्रँड प्लॅन उपलब्ध आहे. या प्लॅनमुळे तुम्हाला १४ ओटीटी प्लॅटफॉर्म्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल.

सकाळ डिजिटल टीम

Jio Fiber Broadband Plans: टेलिकॉम कंपन्या आता मोबाइल प्लॅन्ससोबतच ब्रॉडबँड सर्व्हिस देखील ऑफर करत आहेत. जिओची ब्रॉडबँड सर्व्हिस Jio Fiber अनेक शानदार प्लॅन्स ऑफर करते. कंपनीकडे कमी किंमतीत जास्त बेनिफिट्स देणारे अनेक प्लॅन्स उपलब्ध आहेत. यापैकीच एक प्लॅन ६९९ रुपयांचा आहे. प्लॅनमध्ये १०० एमबीपीएसच्या स्पीडने अनलिमिटेड डेटा मिळेल. मात्र, तुम्ही थोडे अतिरिक्त पैसे खर्च केल्यास तुम्हाला तब्बल १४ ओटीटी अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल. जिओच्या या ब्रॉडबँड प्लॅन्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

हे ही वाचा : शेतमजूर ते कॅनाॅल मॅन...जाणून घ्या एक यशोगाथा....

१४ ओटीटी अ‍ॅप्सचे मिळेल मोफत सबस्क्रिप्शन

जिओकडे ८९९ रुपये किंमतीचा शानदार पोस्टपेड ब्रॉडबँड प्लॅन उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला १४ ओटीटी प्लॅटफॉर्म्सचा मोफत अ‍ॅक्सेस मिळतो. यामध्ये Disney+ Hotstar पासून ते Zee5, Sony LIV चा समावेश आहे. या प्लॅनमधील इतर बेनिफिट्स हे ६९९ रुपयांच्या प्लॅनप्रमाणेच आहेत.

मात्र, तुम्ही २०० रुपये जास्त दिल्यास तुम्हाला १४ ओटीटी अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल. प्लॅनमध्ये १०० एमबीपीएसच्या स्पीडने अनलिमिटेड डेटाचा फायदा मिळतो. याशिवाय, अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि ५५० पेक्षा अधिक ऑन डिमांड टीव्ही चॅनेल्सचा अ‍ॅक्सेस दिला जातो.

या प्लॅनला तुम्ही ३ महिने, ६ महिने आणि १ वर्षासाठी घेऊ शकता. प्लॅनमध्ये Disney+ Hotstar, Sony LIV, ZEE5, Voot Select, Voot Kids, SunNXT, Hoichoi, Discovery+, Universal+, ALTBalaji, Eros Now, Lionsgate Play, ShemarooMe, Jio Cinema आणि Jio Saavn चे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल. म्हणजेच, या ओटीटी प्लॅटफॉर्म्ससाठी तुम्हाला अतिरिक्त पैसे खर्च करावे लागणार नाहीत.

जिओचा हा प्लॅन नवीन ग्राहकांसाठी देखील उपलब्ध आहे. यासोबत तुम्हाला फ्री सेट-टॉप बॉक्स देखील मिळेल. प्लॅनला जिओ फायबरच्या अधिकृत वेबसाइटवरून बुक करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court: गर्भपातासाठी पतीची परवानगी नको! उच्च न्यायालयाचे एकाच दिवशी दोन मोठे ऐतिहासिक निर्णय, महिलांना मोठा दिलासा

Nagpur News: नागपूरात बोगस बांधकाम कामगार नोंदणी; दलालांचे धाबे दणाणले, नागपूर, वर्धा जिल्ह्यात कारवाई!

Shoumika Mahadik : शौमिका महाडिक जिल्हा परिषद निवडणूक लढवणार की नाही, ४ शब्दात कंडका पाडला...

CM Devendra Fadnavis : मुंबईत जन्माला येऊन तुम्ही काय केले? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे बंधूंना सवाल

Prakash Ambedkar : 'भाजप सर्वात मोठा भ्रष्टाचारी पक्ष, अजितदादा-एकनाथ शिंदे त्यांच्या तालावर नाचताहेत'; अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांचा घणाघात

SCROLL FOR NEXT