jio air fiber  sakal
विज्ञान-तंत्र

Jio Fibre: एका महिन्यासाठी जिओचा वायफाय एकदम फ्री, फक्त करावा लागेल 'इतक्या' रुपयांचा रिचार्ज

विशेष बाब म्हणजे जर तुम्ही दीर्घ मुदतीच्या प्लॅनसह रिचार्ज केले तर तुम्हाला 1 महिन्यासाठी मोफत वायफाय सेवांचा अ‍ॅक्सेस दिला जात आहे. याशिवाय यूजर्सना फ्री वायफाय इन्स्टॉलेशनचा पर्यायही देण्यात आला आहे.

Manoj Bhalerao

Jio Fibre New Plans:रिलायंस जिओची वायफाय सेवा JioFiber देखील भारतातील लाखो वापरकर्ते वापरतात आणि जिओ फायबरकडून हाय-स्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा दावा देखील करण्यात येतो. विशेष बाब म्हणजे जर तुम्ही दीर्घ मुदतीच्या प्लॅनसह रिचार्ज केले तर तुम्हाला 1 महिन्यासाठी मोफत वायफाय सेवांचा अ‍ॅक्सेस दिला जात आहे. याशिवाय यूजर्सना फ्री वायफाय इन्स्टॉलेशनचा पर्यायही देण्यात आला आहे.

वापरकर्त्यांनी JioFiber पोस्टपेड योजना निवडल्यास, त्यांना कोणतेही इंस्टॉलेशन शुल्क द्यावे लागणार नाही आणि कंपनी विनामूल्य WiFi स्थापित करेल. यासाठी एकाच वेळी किमान ६ महिने वायफाय रिचार्ज करावे लागेल. त्याच वेळी, जर तुम्हाला प्रीपेड JioFiber इंस्टॉल करायचे असेल, तर तुम्हाला 1500 रुपये इन्स्टॉलेशन शुल्क द्यावे लागेल. संपूर्ण 1 महिन्यासाठी तुम्हाला मोफत वायफायचा लाभ कसा मिळेल ते आम्ही तुम्हाला सांगू.

३० दिवस मोफत वायफाय

जर तुम्ही JioFiber वापरकर्ता असाल किंवा नवीन कनेक्शन घेणार असाल, तर तुम्हाला माहिती पाहिजे की कंपनी 30 दिवसांसाठी मोफत हाय-स्पीड इंटरनेटचा लाभ देत आहे. तुम्ही तुमच्या कोणत्याही वायफाय प्लॅनमधून पूर्ण 12 महिन्यांसाठी रिचार्ज केल्यास, तुम्हाला त्याच प्लॅनचे फायदे 1 महिन्यासाठी मोफत दिले जातील. म्हणजेच रिचार्जचा लाभ 12 महिन्यांऐवजी 13 महिन्यांसाठी दिला जाईल.

जर तुम्ही तुमचा सध्याचा JioFiber प्लान 6 महिन्यांसाठी रिचार्ज केला तर, तुम्हाला 15 दिवसांसाठी मोफत कनेक्टिव्हिटी दिली जाईल. सहा महिन्यांनंतरही त्याच प्लॅनचा लाभ पुढील 15 दिवस मोफत मिळत राहील . तुम्ही 30mbps ते 1Gbps स्पीड असलेली कोणताही प्लॅन निवडू शकता आणि तुम्हाला अतिरिक्त फायदेही मिळतील. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT