Jio Network Outage  
विज्ञान-तंत्र

Jio Network Outage Causes : अंबानी बाप बेट्याचं भांडण की डेटा सेंटरला आग? जिओ डाऊन होण्यामागचं कारण काय? अफवांना उधाण

Jio network down : रिलायन्स जिओचे नेटवर्क आज सकाळी ११ वाजून आठ मिनीटांनी ठप्प झाले होते

रोहित कणसे

रिलायन्स जिओचे नेटवर्क आज सकाळी ११ वाजून आठ मिनीटांनी ठप्प झाले होते. यानंतर सोशल मीडियावर वापरकर्त्यांनी तक्रारी करण्यासा सुरूवात केली . डाऊन डिक्टेटर वेबसाइटने दिकेल जिओ नेटवर्क डाऊन असल्याचे कन्फर्म केले. सुमारे चार तास ही सेवा ठप्प झाली होती.

यानंतर सोशल मीडियावर लोकांनी मनस्ताप व्यक्त करण्यास सुरूवात केली. अनेकांनी त्यांचा फोन ऑन-ऑफ केला, अनेकांनी सीम कार्ड देखील काढून परत टाकून पाहिले. पण त्यांना जिओचं नेटवर्क काही मिळाले नाही. अखेर जिओ डाऊन होण्यामागचं खरं कारण समोर आलं आहे.

डाऊन डिक्टेटर वेबसाइटवर तब्बल १०,३७२ जिओ वापरकर्त्यांनी सर्व्हिस डाऊन झाल्याची तक्रार केली. रिपोर्टनुसार ६८ टक्के लोकांनी 'नो सिग्नल' असे सांगितले तर १८ टक्के युटर्सनी मोबाइल इंटरनेट चालत नसल्याची तक्रार केली. अनेकांना जिओचे रिचार्ज करताना अडचण आली. तर अनेकांना माय जिओ अॅप आणि जिओ वेबसाइट एक्सेस करता येत नव्हती.

या आउटेजनंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर #jiodown ट्रेंड करू लागले होते. सोबतच असे सांगितले जात होते की जिओ सर्व्हिस मुंबईत अचानक ठप्प झाली पण संपूर्ण देशभरात याचा परिणाम पाहायला मिळत होता.

यादरम्यान सोशल मीडियावर अनेक जण सोशल मीडियावर मुकेश अंबानी यांना ट्रोल करत होते. मुकेश अंबानी आणि अनंत-राधिका अंबानी यांच्यात वाद झाल्यामुळेच जिओ डाऊन झाल्याची खोचक टीका देखील केली जात होती.

पण जिओ नेमकं का ठप्प झालं?

सोशल मीडियावर काही युजर्सनी दावा केला की आयडीसी डेटा सेंटरमध्ये आग लागल्याने जिओ नेटवर्ग डाऊन झाले. यामुळेअनेकांना मनस्तापाला सामोरे जावे लागले. मात्र जिओकडून याबद्दल कोणतीही ऑफिशियल माहिती देण्यात आलेली नाहीये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election Kolhapur : 'गोकुळ' निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का? माजी अध्यक्ष डोंगळे यांचा थेट इशारा, म्हणाले 'आमच्याशिवाय पर्याय शोधल्यास...'

Asian Games : भारतीय क्रिकेटपटूच्या घराबाहेर पोहोचली तरुणी; खेळाडू श्रेयससोबत जपानमध्ये, तिचा इथे ड्रामा, नेमकं काय घडलं?

पदरात लहान मुलगी, वयही झालेलं नाही तरीही दुसरं लग्न का करत नाहीये मानसी कुलकर्णी? म्हणते, 'सासरचे मला म्हणतात...

Pune Weather: पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! उकाड्यानंतर पुन्हा पावसाची शक्यता; पुढील दोन ते तीन दिवसांचा अंदाज

Mumbai: 'लालबागचा राजा'च्या दर्शनाच्या नावाखाली ४ भाविकांना गंडा, बारावीतील विद्यार्थ्याला अटक

SCROLL FOR NEXT