jio plans offering free netflix and amazon prime and Disney plus Hotstar with 150gb data  reliance jio
विज्ञान-तंत्र

Jio चे दमदार रीचार्ज प्लॅन, फ्री ओटीटी सबस्क्रिप्शन मिळेल 150GB डेटा

सकाळ डिजिटल टीम

रिलायन्स जिओ आपल्या वापरकर्त्यांना तीन प्लॅन ऑफर करत आहेत. या प्लॅन्समध्ये तुम्हाला Netflix, Amazon Prime Video आणि Disney + Hotstar चे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल. विशेष बाब म्हणजे या प्लॅनमध्ये कंपनी 150GB पर्यंत डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही देत ​​आहे. जिओच्या 399, 599 आणि 799 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये हे फायदे दिले जात आहेत. चला डिटेल्स जाणून घेऊया.

399 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन

Jio चा हा प्लॅन संपूर्ण बिल सायकलमध्ये वापरकर्त्यांना इंटरनेट वापरासाठी 75 GB डेटा ऑफर करतो. डेटा लिमिट संपल्यानंतर यूजर्सला 1 GB डेटासाठी 10 रुपये खर्च करावे लागतील. कंपनी प्लॅनमध्ये 200 GB पर्यंत डेटा रोलओव्हर बेनिफिट देखील देत आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 100 मोफत एसएमएससह अमर्यादित कॉलिंग देखील मिळेल. या प्लॅनसह, कंपनी Jio वापरकर्त्यांना Netflix, Amazon Prime Video आणि Disney + Hotstar चे मोफत सबस्क्रिप्शन देखील देत आहे.

599 रुपयांचा प्लॅन

कंपनीचा हा प्लॅन 100 GB डेटा आणि अतिरिक्त सिमसह येतो. हा प्लॅन 200 GB पर्यंत डेटा रोलओव्हर देखील देतो.डे टा मर्यादा संपल्यानंतर, या प्लॅनच्या वापरकर्त्यांना 1 जीबी डेटासाठी 10 रुपये देखील द्यावे लागतील. संपूर्ण बिल सायकलसाठी या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 100 मोफत एसएमएस आणि अमर्यादित कॉलिंग देखील मिळेल. Jio चा हा प्लॅन वापरकर्त्यांना Netflix, Amazon Prime Video आणि Disney + Hotstar चे मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळते.

Jio च्या 799 रुपयांचा प्लॅन

कंपनी या प्लॅनमध्ये एकूण 150 GB डेटा देत आहे. या प्लॅनमध्ये कंपनी 200 GB पर्यंत डेटा रोलओव्हर ऑफर करते. डेटा मर्यादा संपल्यानंतर या प्लॅनच्या सदस्यांना 1GB डेटासाठी 10 रुपये देखील आकारले जातील. प्लॅनमध्ये तुम्हाला देशभरातील सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 मोफत एसएमएस मिळतील. प्लॅनची ​​खास गोष्ट म्हणजे यासोबत तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसाठी 2 अतिरिक्त सिम देखील घेऊ शकता .जिओचा हा प्लॅन इतर पोस्टपेड प्लॅनप्रमाणे Netflix, Disney + Hotstar आणि Amazon Prime Video चे मोफत सबस्क्रिप्शन देखील देतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT