Jio Prepaid Plan
Jio Prepaid Plan esakal
विज्ञान-तंत्र

Jio Prepaid Plan : Jio ची धमाकेदार ऑफर, एकदाच रिचार्ज करा अन् 20GB डाटा मिळवा Extra

सकाळ डिजिटल टीम

Jio Prepaid Plan : रिलायंस जिओच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. होळी अन् IPL 2024 च्या शुभ मुहूर्तावर जिओ कंपनी ग्राहकांना मोठं गिफ्ट देणार आहे. टेलिकॉम कंपनीच्या एका प्लॅनवर तब्बल 20 GB डेटा फ्रि मिळणार आहे. IPL प्रेमी लोकांसाठी ही पर्वणीच ठरणार आहे. कारण, JioCinema ऍपवरून IPL 2024 फुकटात पाहता येणार आहे.

जिओच्या ज्या प्लॅनवर ही ऑफर सुरू आहे त्याची किंमत 749 आहे. या प्लॅनमध्ये इटरनेट डाटा, SMS आणि अनलिमिटेड कॉलिंग आहे. या ऑफरमध्ये प्लस पॉईंट असा आहे की, या प्लॅनची व्हॅलिडीटीही अनेक महिन्यांची आहे. त्यामुळे सतत रिचार्ज करण्याची आवश्यकता भासणार नाही.

जिओचा 749 चा प्लॅन

जिओसिनेमाच्या सब्सक्रायबर्सना 749 च्या रिचार्जवर 2GB डाटा डेली मिळत आहे. या व्यतिरिक्त अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 SMS फ्री आहेत. हा प्लॅन जिओ कंपनीच्या सर्व Apps जसे की, Jio TV, JioCinema, JioCloud यासाठी असेल. हा प्लॅन 90 दिवसांच्या व्हॅलिडीटीसह मिळणार आहे.

क्रिकेट ऑफरसह हा प्लॅन 20 GB एक्स्ट्रा डाटा देणार आहे. म्हणजेच संपूर्ण पॅकमध्ये 200 GB (180GB +20 GB ) एक्स्ट्रा डाटा मिळणार आहे. या एक्स्ट्रा डाटाला युजर्स कधीही वापरू शकतात.

अनलिमिटेड 5G डाटा

कंपनीचा हा प्लॅन Jio Welcome Offer चा भाग आहे. म्हणजेच जे यूजर्स जिओच्या 5G कनेक्टिव्हिटीच्या क्षेत्रात राहत आहेत. ज्यांच्याकडे 5G स्मार्टफोन आहे त्यांना अनलिमिटेड 5G डेटाचा फायदा होणार आहे. या यूजर्ससाठी डेली डाटा लिमिट लागू होणार नाही ते कितीही डेटा वापरू शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Paresh Rawal: "मतदान न करणाऱ्यांचे टॅक्स वाढवा.."; परेश रावल यांनी केली शिक्षेची मागणी

RCB vs CSK: चेन्नईला पराभूत झालेलं पाहताच दिग्गज क्रिकेटरचे पाणावले डोळे, Video होतोय व्हायरल

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Apple News : ॲपल कंपनीने नाकारले १७ लाख ऍप ; जाणून घ्या काय आहे प्रकरण

SCROLL FOR NEXT