Jio Google
विज्ञान-तंत्र

Jio रिचार्जच्या दरात वाढ; 1 डिसेंबरपासून नवे दर

सकाळ डिजिटल टीम

एअरटेल, व्होडाफोन-आय़डिया नंतर आता जिओनेसुद्धा त्यांच्या रिचार्जच्या किंमतीत वाढ केली आहे.

एअरटेल, व्होडाफोन-आय़डिया नंतर आता जिओनेसुद्धा त्यांच्या रिचार्जच्या किंमतीत वाढ केली आहे. जिओ प्रिपेडच्या रिचार्जच्या दरात २० टक्के वाढ करण्यात आली आहे. याआधी एअरटेलने २५ टक्के वाढ केली होती. एअरटेलचे नवे दर २६ नोव्हेंबरपासून लागू झाले आहेत. तर जिओनेसुद्धा त्यांच्या प्लॅनच्या किंमतीत वाढ केली असून नवे दर १ डिसेंबरपासून लागू होतील.

जिओने ३१ रुपयांपासून ते ४८० रुपयांपर्यंतच्या रिचार्जचे दर वाढवले आहेत. जिओ फोनसाठी ७५ रुपयांचा रिचार्ज आता ९१ रुपये असणार आहे. तर १२९ रुपयांचा प्लॅन १५५ रुपयांना मिळणार आहे. एक वर्ष वैधता असलेल्या प्लॅनमध्ये सर्वाधिक वाढ झाली असून २३९९ रुपयांचा प्लॅन आता २८७९ रुपयांना मिळेल.

जिओच्या डाटा अॅड ऑन प्लॅनचे दरही वाढले आहेत. आता ६ जीबीचा ५१ रुपयांचा प्लॅन ६१ रुपयांना तर १०१ रुपयांचा १२ जीबी डाटा प्लॅन १२१ रुपयांना मिळणार आहे. तसंच ५० जीबी डाटाचा प्लॅन ५० रुपयांनी महाग झाला असून त्यासाठी ३०१ रुपये मोजावे लागणार आहेत.

व्होडाफोन-आयडियाच्या ग्राहकांना ७९ रुपयांचा प्लॅन ९९ रुपयांना मिळणार आहे. तर १४९ रुपयांचा रिचार्ज १७९ रुपये झाला आहे. तर १४९८ रुपयांच्या प्लॅनसाठी १७९९ रुपये मोजावे लागतील. २३९९ रुपयांचा प्लॅन आता २८९९ रुपयांना मिळेल. तर डेटा टॉपअपचे दरही वाढले असून ४८ रुपयांचा प्लॅन ५८ रुपयांना आणि २५१ रुपयांचा टॉपअप २९८ रुपयांना मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT