jiotv plus streaming on android and apple fire tv esakal
विज्ञान-तंत्र

JioTV Plus App Update : जिओ वापरकर्त्यांसाठी खुशखबर! स्मार्ट टीव्हीवर घ्या JioTV+ ॲपचा आनंद, सेट टॉप बॉक्सविना मिळणार भरपूर मनोरंजन

reliance jio to introduce jiotv plus app for smart tv : जिओ फायबर आणि जिओ एअर फायबर ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही तुमच्या स्मार्ट टीव्हीवर JioTV+ ॲपचा आनंद घेऊ शकता.

Saisimran Ghashi

Jio TV Plus New Paln : जिओ फायबर आणि जिओ एअर फायबर ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही तुमच्या स्मार्ट टीव्हीवर JioTV+ ॲपचा आनंद घेऊ शकता. जिओने त्यांचं JioTV+ ॲप आता Android TV, Apple TV आणि Amazon Fire OS आधारित स्मार्ट टीव्हीवर उपलब्ध करून दिलं आहे. आधी हे ॲप फक्त जिओच्या सेट टॉप बॉक्सवरच वापरता येत होते.

JioTV+ ॲपवर 800 पेक्षा जास्त विविध वाहिन्या आणि 13 लोकप्रिय OTT ॲप्स जसे की JioCinema, Disney+ Hotstar, Sony Liv, Zee5 आणि FanCode एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत. म्हणजे आता तुम्हाला वेगवेगळ्या ॲप्समधून लॉग इन करण्याची गरज नाही. त्याचबरोबर तुमच्या आवडीच्या कार्यक्रमांचे सुचित सुसंगठित सल्ले मिळतील आणि भाषा आणि गटानुसार तुम्ही कार्यक्रम शोधू शकता.

कोणत्या ग्राहकांना मिळणार JioTV+ ॲपचा फायदा?

Jio फायबर आणि Jio एअर फायबरच्या सर्वच ग्राहकांना हा फायदा मिळणार नाही. खालील प्लॅन असणाऱ्या ग्राहकांना हा फायदा मिळणार नाही.

JioAirFiber: सर्व प्लॅन्स

JioFiber पोस्टपेड: रु. ५९९, रु. ८९९ आणि त्यावरील

JioFiber प्रीपेड: रु. ९९९ आणि त्यावरील

ॲप डाउनलोड करण्याची पद्धत

तुम्ही तुमच्या Android TV, Apple TV किंवा Amazon Fire OS आधारित टीव्हीवर Google Play Store वरुन JioTV+ ॲप डाउनलोड करू शकता.

कोणत्या टीव्हीवर उपलब्ध नाही?

सध्या सॅमसंग च्या टीव्हीवर ज्या Android TV वर चालत नाहीत अशा टीव्हीवर हे ॲप उपलब्ध नाही. कारण JioTV+ ॲप Samsung च्या ऑपरेटिंग सिस्टमनवर उपलब्ध नाही. जर तुमच्याकडे स्मार्ट टीव्ही नसेल तर तुम्ही Jio चा सेट टॉप बॉक्स घेऊन हा फायदा घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: आई, शप्पथsss...! श्रेयस अय्यरचा अविश्वसनीय झेल पाहून रोहित शर्मा अवाक्... सूर्याचे डोळे विस्फारले... IPL2026 मधील बेस्ट कॅच

LPG वर संकट की दिलासा? होर्मुझ तणावातही सरकारचं मोठं आश्वासन; तुमच्या घरच्या गॅसबद्दल जाणून घ्या सत्य!

SCROLL FOR NEXT