Kinetic Green Zulu eSakal
विज्ञान-तंत्र

Zulu : कायनेटिक ग्रीनची नवी इलेक्ट्रिक दुचाकी 'झुलू' बाजारात; अमेझॉन अन् फ्लिपकार्टवरुन करता येणार खरेदी

Kinetic Green : कायनेटिक ग्रीनच्या संस्थापक आणि सीईओ सुलज्जा फिरोदिया मोटवानी यांनी आज येथे या स्कूटरचे अनावरण केले.

सकाळ वृत्तसेवा

Kinetic Green Zulu E-Scooter : कायनेटिक आणि फिरोदिया ग्रुपची इलेक्ट्रिक वाहने उत्पादन करणारी कंपनी कायनेटिक ग्रीन तर्फे आज खास तरुणांसाठीची झुलू ई-स्कूटर बाजारात आणली. तिची किंमत ९४,९९० रुपये असणार आहे. विशेष म्हणजे, ही स्कूटर तुम्ही ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट या वेबसाईट्सवरुनही खरेदी करू शकाल.

कायनेटिक ग्रीनच्या संस्थापक आणि सीईओ सुलज्जा फिरोदिया मोटवानी यांनी या स्कूटरचे अनावरण केले. याचबरोबर आगामी काळात पर्यावरण रक्षणासाठी कायनेटिक ग्रीन ग्रुप करणार असलेल्या महत्त्वाच्या उपाययोजनांचीही त्यांनी माहिती दिली.

ही इलेक्ट्रिक स्कूटर ताशी ६० किलोमीटरच्या कमाल वेगाने धावू शकेल. याची अत्याधुनिक बॅटरी फक्त तीस मिनिटांमध्ये ८० टक्क्यांपर्यंत फास्ट चार्ज होईल आणि ती एक लाख वीस हजार किलोमीटर अंतर जाईपर्यंत तिचे आयुष्य राहील. बॅटरीच्या प्रत्येक चार्ज नंतर ती १०४ किलोमीटर धावेल. ही इलेक्ट्रिक स्कूटर शंभर टक्के मेड इन इंडिया असल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी कंपनीचे संचालक धीरेंद्र सिंह, अध्यक्ष (दुचाकी) पंकज शर्मा आदी हजर होते.

शहरातील प्रदूषण, गर्दी हे सगळे टाळून आपल्याला आपली पृथ्वी स्वच्छ आणि हरित करायची आहे. या उद्दिष्टाला बळ देण्यासाठी ही स्कूटर बाजारात आणली आहे. यामुळे वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण कमी होईलच, पण या स्कूटरचा देखभाल खर्चही अत्यंत कमी आहे. कायनेटिक ग्रीनच्या ई वाहनांमुळे दोन वर्षात एक लाख टन कार्बन उत्सर्जन कमी झाल्याचेही त्या म्हणाल्या. 

कंपनीने आतापर्यंत दहा लाख इलेक्ट्रिक वाहने विकली असून तीनशे शहरात पाचशे विक्रेत्यांचे जाळे आहे. विकलेल्या प्रत्येक वाहनांसाठी कंपनी एक झाड लावणार असून लवकरच भारतभर एक कोटी झाडे लावण्याचे ध्येय आहे. कंपनी इलेक्ट्रिक दुचाकी आणि तिचाकी वाहन निर्मितीमधील पहिल्या पाच क्रमांकाची मोठी कंपनी असून २०१९ पर्यंत ते दरवर्षी दहा लाख वाहने विकतील. त्यानंतर दरवर्षी दहा हजार कोटी रुपये महसूल इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीतून मिळेल, असेही त्या म्हणाल्या. 

इलेक्ट्रिक लुना येणार

लवकरच दहा लाख इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करणारी मोठी फॅक्टरी पुण्याजवळ सुपे येथे उभारली जाईल. तर २०२४ मध्ये इलेक्ट्रिक लुना पुन्हा बाजारात येईल, असेही त्या म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT