भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) च्या बहुतेक रिचार्ज प्लॅन त्यांच्या प्रतिस्पर्धी कंपन्या जिओ, एअरटेल आणि Vi पेक्षा स्वस्त आणि दीर्घ वैधता असणारे आहेत. आज आम्ही तुमच्यासाठी बीएसएनएलचा असाच एक रिचार्ज प्लॅनविषयी जाणून घेणार आहोत.
हा प्लॅन 60 दिवसांपर्यंतच्या वैधतेसह येतो, ज्यामध्ये आपल्याला दररोज डेटा आणि कॉलिंगसारखे फायदे मिळतात. त्याचबरोबर इतर टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत या प्लॅनची किंमत खूपच किफायतशीर आहे. जिओ, एअरटेल आणि व्ही (व्होडाफोन आयडिया) डेली डेटा असणार यासारख्या कोणतीही प्लॅन देत नाहीत.
बीएसएनएलची 108 रुपयांची प्रीपेड प्लॅन अंतर्गत ग्राहकांना अमर्यादित कॉलिंग सुविधा मिळते, ज्यात दिल्ली आणि मुंबई एमटीएनएल नेटवर्कचा समावेश आहे. अमर्यादित कॉलिंग व्यतिरिक्त ही योजना अमर्यादित डेटा बेनिफीट देखील देतो. तसोच 1 जीबी डेटा संपल्यानंतरत तुमच्या इंटरनेटची गती 80 केबीपीएस पर्यंत कमी होते. याचा अर्थ असा की आपण 108 रुपयांच्या योजनेमध्ये दररोज केवळ 1 जीबी हाय-स्पीड डेटा वापरू शकता. तसेच या योजनेत तुम्हाला एकूण 500 एसएमएस देखील फ्री मिळतात. याआधी हा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येत असे, परंतु दूरसंचार क्षेत्रात वाढती स्पर्धा लक्षात घेता कंपनीने आपल्या प्रीपेड योजनेची वैधता 28 दिवसांवरून 60 दिवसांपर्यंत वाढविली आहे.
जर आपण बीएसएनएलच्या या प्लॅनची तुलना इतर टेलिकॉम कंपन्यांच्या प्लॅनशी केली तर जिओ प्रीपेड या किंमतीच्या 125 रुपये किंमतीच्या प्लॅनमध्ये आपल्याला केवळ 28 दिवसांची वैधता मिळेल. 28 दिवसांच्या वैधतेसह, आपल्याला दररोज 0.5 GB डेटा आणि अमर्यादित कॉलिंग आणि एकूण 300 एसएमएस फ्री मिळतात. त्याचबरोबर, एअरटेल 129 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये 24 दिवसांच्या वैधतेसह 1 जीबी डेटा देण्यात येतो, ज्यामध्ये अमर्यादित कॉलिंग आणि 300 एसएमएस फ्री आहे. व्ही 129 रुपयांची प्लॅनमध्ये 24 दिवसांच्या वैधतेसह 2 जीबी डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि 300 एसएमएस फ्री आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.