know about these amazing features of telegram Marathi article 
विज्ञान-तंत्र

Telegram मध्ये येतायत काही जबरदस्त फिचर्स, जाणून घ्या सविस्तर

सकाळ डिजिटल टीम

भारतात टेलीग्राम वापरणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. व्हॉट्सअ‍ॅपची प्रायव्हसी पॉलिसी वादात सापडल्यानंतर लोक हे सध्या इतर पर्यायांच्या शोधत आहेत. अशा परिस्थितीत टेलीग्राम हे अॅप सध्या त्यांची पहिली पसंती ठरताना दिसत आहे. दरम्यान टेलीग्राम मध्ये बऱ्याच अडव्हांस फिचर्सची सतत भर पडताना दिसत आहे, आज आपण टेलीग्रामच्या अशा काही खास फिचर्स विषयी जाणून घेणार आहोत.

मॅसेज शेड्यूल आणि एडीट करणे शक्य

टेलिग्राममध्ये आपण आपल्या वेळेनुसार मॅसेज शेड्यूल करू शकता. सोप्या भाषेत, आपण आपला मॅसेज एका विशिष्ट वेळेसाठी सेट केला की, आपला तो मॅसेज आपोआप पाठविला जाईल. याशिवाय आपण आपला पाठविलेला मॅसेज टेलिग्राममध्ये एडीट देखील करू शकता. हे फिचर इतर कोणत्याही अॅपमध्ये उपलब्ध नाही.

जवळपासचे यूजर कनेक्ट 

टेलिग्राम वापरकर्ते त्यांच्या सभोवतालचे कॉन्टॅक्ट लोकेट करु शकतात. यासह, आपण टेलिग्रामद्वारे इतर व्यक्तीशी फार लवकर कनेक्ट होऊ शकता. या अ‍ॅपचे हे सगळ्यात जबरदस्त फिचर आहे. 

अनलिमिटेड स्टोरेज आणि शेयरिंग क्षमता

टेलीग्राम आपल्‍याला अनलिमिटेड क्लाउड स्टोरेज सुविधा देते . याद्वारे आपण क्लाऊडवर आपला डेटा सेव करू शकता. या व्यतिरिक्त, आपण टेलिग्रामवर 1.5 जीबी पर्यंत फायली शेयर करू शकता. आपल्या व्यावसायिक जीवनात हे फिचर उपयोगी ठरू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WOMEN'S ASIA CUP 2026 FINAL: पाकिस्तानचा पत्ता कट अन् भारतासमोर श्रीलंकेचं आव्हान! महिला एशिया कप फायनल कधी, कुठे आणि किती वाजता?

CM Devendra Fadnavis : विदर्भ बनणार ‘मायनिंग-ग्रीन स्टील हब’; खाण क्षेत्र अर्थव्यवस्थेत अर्धा ट्रिलियन डॉलरचे योगदान

मुंबई गोवा मार्गावर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी, वाहनांच्या ८ ते ९ किमी रांगा; प्रवाशी संतप्त

Marathi News Live Updates : पुण्याजवळ पाबे घाटात ट्रक दरीत कोसळला, दोघे जखमी

Aditi Swami Success Story : अर्जुन पुरस्कार विजेत्या आदितीचा डंका! मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारीपदी वर्णी; ओजस देवतळे, प्रथमेश फुगे यांचीही नियुक्ती

SCROLL FOR NEXT