Car Buying 
विज्ञान-तंत्र

डिसेंबरमध्ये डिस्काउंट ऑफरवर नवी कार घेताय? जाणून घ्या फायदे-तोटे

सकाळ डिजिटल टीम

Car Buying Tips : 2021 हे वर्ष लवकरच संपणार आहे, सर्वजन नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत, या काळात अनेक ऑटो कंपन्या जास्तीत जास्त स्टॉक क्लिअर करण्यासाठी वहानांवर आकर्षक सूट देतात. तसेच अनेक वाहन कंपन्या जानेवारी 2022 पासून त्यांच्या मॉडेल्सच्या किमती वाढवणार आहेत. त्यामुळे नवीन कार खरेदी करण्यासाठी डिसेंबर महिना चांगला ठरतो. मात्र वर्षाच्या शेवटी लागणाऱ्या सेलमध्ये कार (Car) किंवा बाईक खरेदी (Bike) करण्याचे फायदे आहेत तसे काही तोटे देखील आहेत.

बेस्ट डिल्स मिळू शकतात

बर्‍याच ऑटो कंपन्या वर्षाच्या शेवटी त्यांची स्टॉक क्लिअर करण्यासाठी मोठ्या सवलती देतात. तसेच कॅश सूट डिस्काउंटसोबत खरेदीदारांना जास्त वॉरंटी आणि अॅक्सेसरीज देखील मिळतात. या वर्षी, Honda कंपनी Honda Jazz वर ​​ 12,147 रुपयापर्यंत आणि Honda City वर 8,108 पर्यंतच्या अॅक्सेसरीज ऑफर करत आहे. Renault Duster, Kiger, Triber आणि Kwid वर सवलत देत आहे. त्याच वेळी, Hyundai डिसेंबरमध्ये निवडक मॉडेल्सवर सूट देत आहे.

कमी किमतीत खरेदी करता येईल

बर्‍याच वाहन कंपन्यांनी वाढत्या इनपुट खर्चाची भरपाई करण्यासाठी जानेवारीमध्ये त्यांच्या किमती वाढवणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे डिसेंबरमध्ये खरेदी करणे चांगले ठरते. या महिन्यात खरेदी केल्याने तुमचे अतिरिक्त पैसे वाचतील.

एक्सचेंज डिल

तुमच्या जुन्या कार किंवा बाईक एक्सचेंज करण्यासाठी डिसेंबर हा चांगला महिना ठरतो, कारण बहुतेक कंपन्या चांगल्या एक्सचेंज डील या काळात देतात. डीलर वापरलेल्या कार किंवा बाईकवर एक नजर टाकतो आणि चालू वर्षाच्या किमती पाहून ऑफर दिली जाते. या वर्षी, Honda Amaze वर तब्बल 6,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि Honda City वर 9,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळत आहे.

तोटे काय आहेत?

डिसेंबरमध्ये कार किंवा बाईक घेण्याचा सर्वात मोठा तोटा म्हणजे ग्राहकांना जुन्या मॉडेल खरेदी करावे लागते. जेव्हा ते काही आठवड्यांनंतर नवीन मॉडेल खरेदी करू शकतात. याशिवाय जुने वाहन खरेदी केल्याने त्याचे रिसेल व्हॅल्यू देखील कमी होते. एक मोठा तोटा म्हणजे मॉडेलमधील बदल येणे हे देखील आहे. नवीन वर्षात लॉन्च झालेल्या मॉडेल्समध्ये ऑटो कंपन्या अनेक बदल करतात, त्यामध्ये तुम्हाला काही नवीन फीचर्स, कलर ऑप्सन्स देखील मिळू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hotel Bhaghyashree: 'हॉटेल भाग्यश्री'च्या मालकाने घेतला मोठा निर्णय; कोट्यवधी रुपयांची केली गुंतवणूक, हॉटेल बंद...

Pune News: कोथरुडमधील आजी-आजोबांच्या वडापाव गाडीवर महापालिकेचा अन्याय, तोंडचा घास हिरावणारी कारवाई

प्राजक्ताने खरेदी केली अलिशान गाडी! व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आई शप्पथ! लई भारी वाटतंय स्वप्न पुर्ण होताना..'

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

SCROLL FOR NEXT