know how to save photos in jpg format in iphone Marathi article 
विज्ञान-तंत्र

iPhone मध्ये HEIC फोटो JPG फॉरमॅट कसे बदलावेत? ही आहे सोपी पध्दत

सकाळ डिजिटल टीम

पुणे : Apple ने ios 11 सह फोटो आणि व्हिडिओसाठी त्यांचे डीफॉल्ट कॅमेरा फॉरमॅट JPG वरुन बदलून HEIC (High-Efficiency Image Format) मध्ये केला आहे. जेणेकरुन आयफोनमध्ये फोटो आणि व्हिडीओ  कमी स्पेस वापरेल. हा बदल जरी हा जुना असेल, परंतु या बदलानंतर आपण जेव्हा आपल्या आयफोनचे फोटो आणि व्हिडिओ आपल्या लॅपटॉपवर कॉपी करता तेव्हा ते उघडत नाहीत त्याचे कारण HEIC फॉरमॅट हे आहे.

HEIC हा फॉरमॅट जरी JPG पेक्षा कमी जागा खर्च करुन दर्जेदार फोटो आणि व्हिडीओ देत असेल, परंतु लॅपटॉप आणि संगणकांमध्ये ते उघडत नसल्याने अडचणीचे ठरु शकते. तसेच  Apple आपल्याला कॅमेरा अॅपमधील डीफॉल्ट सेटिंग्ज बदलण्याची परवानगी देखील देत नाही. अशा वेळी देखील तुम्ही सेटिंग्जमध्ये जाऊन फॉरमॅट बदलू शकता, कसे? ते आपण आज जाणून घेणार आहोत.

HEIC फॉरमॅटचे फोटो जेपीजीमध्ये बदल्याण्याची सोपी पध्दत पुढील प्रमाणे आहे..

- सर्व प्रथम आपल्या आयफोनच्या सेटिंग्जवर जा.

- आता कॅमेर्‍यावर टॅप करा. येथे आपल्याला फॉरमॅट्स, ग्रिड, प्रीझर्व्ह सेटिंग्ज आणि कॅमेरा मोडसारखे पर्याय दिसतील.

- आपल्याला फॉरमॅट वर क्लिक करावे लागेल.

-आता येथे तुम्हाला HEIC (High-Efficiency Image Format)ला Most Compatible करावे लागेल.

- आता आपले फोटो HEIC ऐवजी JPG मध्ये आपोआप सेव होतील.

दरम्यान हे लक्षात ठेवा की, आपण काढलेले आधीचे फोटो आणि व्हिडीओ  HEIC स्वरूपातच राहतील, फक्त नवीन फोटो JPG मध्ये सेव केली जातील.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चित्रपट संस्कृतीचा मानदंड! २२व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाची सुरूवात; कधी आणि कुठे होणार सोहळा?

Jemimah Rodrigues बनली कर्णधार, आता स्मृती मानधना, हरमप्रीत कौरलाही देणार टक्कर! तीन वेळा उपविजेत्या ठरलेल्या संघाचा मोठा निर्णय

Swiggy food trends 2025 : भारतीयांनी २०२५ मध्ये ‘स्विगी’वर सर्वाधिक ऑर्डर केला ‘हा’ पदार्थ; तुम्ही खाल्लाय का?

Solapur News : विद्या मंदिर चे स्नेहसंमेलन म्हणजे ग्रामीण मुलांसाठीची पर्वणीच- तहसीलदार मदन जाधव.

Latest Marathi News Live Update : सदानंद दाते लवकरच महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक!

SCROLL FOR NEXT