Voter ID Sakal
विज्ञान-तंत्र

Voter ID: मतदान ओळखपत्र हरवले आहे? घाबरू नका, 'ही' प्रोसेस फॉलो करून घरबसल्या करा डाउनलोड

निवडणुकीच्या काळात मतदान ओळखपत्राचा उपयोग होतो. तुमचे मतदान ओळखपत्र हरवले असल्यास सहज डाउनलोड करू शकता.

सकाळ डिजिटल टीम

Voter ID Download Process: दरमहिन्याला देशातील कोणत्यातरी भागात निवडणूक पार पडत असतेच. लवकरच महाराष्ट्रात देखील महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडणार आहे. निवडणुकीत मतदान करण्यासाठी तुमच्याकडे वोटर आयडी कार्ड असणे गरजेचे आहे. वोटर आयडी कार्डचा वापर तुम्ही ओळखपत्र म्हणूनही करू शकता.

तुमच्याकडे मतदान ओळखपत्र नसल्यास तुम्ही त्वरित बनवू शकता. तुमचे मतदान ओळखपत्र हरवले असल्यास अथवा सापडत नसल्यास काळजी करण्याचे कारण नाही. तुम्ही घरबसल्या सहज ओळखपत्र डाउनलोड करू शकता. या प्रोसेसविषयी जाणून घेऊया.

हेही वाचा: भारतीय उत्पादनांच्या खरेदीतली वाढ बनवेल देशाला आर्थिक महासत्ता...

पीडीएफ फॉर्मेटमध्ये डाउनलोड करू शकता मतदान ओळखपत्र

मतदान ओळखपत्र डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला voterportal.eci.gov.in वर जावे लागेल. त्यानंतर तुम्हाला EPIC नंबर अथवा फार्म रेफरंस नंबर द्यावा लागेल. आता तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल, तो टाका. पुढे Download E-Epic चा पर्याय दिसेल, यावर क्लिक करा. आता तुमचे डिजिटल मतदान ओळखपत्र पीडीएफ फॉर्मेंटमध्ये डाउनलोड होईल.

मतदान ओळखपत्र डाउनलोड करण्यासाठी फॉलो करा ही प्रोसेस

  • सर्वात प्रथम तुम्हाला निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.

  • त्यानंतर Form6 वर जाऊन Apply online for registration of new voter ID वर क्लिक करा.

  • New User वर क्लिक करून येथे तुमचे नाव, वय आणि लिंग इत्यादी माहिती नमूद करा.

  • आता पत्ता आणि इतर माहिती द्या.

  • पुढे तुम्हाला दोन लोकांची माहिती द्यावी लागेल, जे तुम्हाला व्हेरिफाय करू शकतील.

  • संपूर्ण माहिती दिल्यानंतर ओळखपत्र व पत्त्याचा पुरावा म्हणून इतर कागदपत्रं अपलोड करावी लागतील.

  • त्यानंतर तुमच्या फोन आणि रजिस्टर्ड ईमेल आयडीवर एक अ‍ॅप्लिकेशन नंबर मिळेल.

  • या नंबरचा वापर मतदान ओळखपत्राचे स्टेट्स चेक करण्यासाठी होईल.

  • संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर तुम्ही मतदान ओळखपत्र डाउनलोड करू शकता.

डुप्लिकेट मतदान ओळखपत्रासाठी द्यावी लागेल माहिती

यासाठी तुम्हाला https://www.nvsp.in/ वर जाऊन एक फॉर्म डाउनलोड करावा लागेल. त्यानंतर सर्व कागदपत्रं अपलोड करा. तुम्हाला मतदान ओळखपत्र हरवल्यावर पोलिसात तक्रार करावी लागेल. त्यानंतर इतर कागदपत्रं व फॉर्म स्थानिक निवडणूक अधिकाऱ्याकडे जमा करावी लागतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT