Cyber Crime Complaint esakal
विज्ञान-तंत्र

Cyber Crime Complaint : सायबर फ्रॉड झालाय पण तक्रार कशी करायची माहिती नाही? या सोप्या स्टेप्समध्ये नोंदवा ऑनलाईन तक्रार

Cyber Fraud : भारतात सायबर गुन्हेगारी झपाट्याने वाढत आहे. 2024 मध्ये 2023 च्या तुलनेत सायबर गुन्हे खूप जास्त वाढले आहेत.

Saisimran Ghashi

Cyber Attack : भारतात सायबर गुन्हेगारी झपाट्याने वाढत आहे. 2024 मध्ये 2023 च्या तुलनेत सायबर गुन्हे खूप जास्त वाढले आहेत (NCRB data). इंटरनेट वापरणारे वाढत असतानाच फसवणूक करणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे. तुमच्या वैयक्तिक माहितीपासून आर्थिक फसवेगिरीपर्यंत, सायबर गुन्हे अधिकाधिक तंत्रशुद्ध बनत चालले आहेत. पण या हल्ल्यांची शिकार झालात तर काय करायचं? हा प्रश्न बहुतेक लोकांना सतावत असतो.तर यंच उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत.

अतिशय सतर्क न राहिल्यास कोणीही या हल्ल्यांची शिकार होऊ शकतो. अशा परिस्थितीशी तुम्ही कसं सामना करता ते महत्त्वाचं असते. म्हणून, सायबर हल्ल्यांची बाधा आल्यास तुम्ही काय करू शकता ते आत्ताच जाणून घ्या.

सर्वप्रथम, तुमच्या बँकेशी त्वरित संपर्क साधा आणि तुमची वैयक्तिक माहिती लीक झाल्याची माहिती द्या. शक्य तितक्या लवकर तुमचे बँक खाते तात्पुरते बंद करा. त्यानंतर 1930 (सायबर गुन्हेगारीची तक्रार नोंदवण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक) वर कॉल करा किंवा राष्ट्रीय सायबर गुन्हेगारी अहवाल पोर्टलवर ऑनलाइन तक्रार दाखल करा.

ऑनलाइन सायबर गुन्हेगारीची तक्रार दाखल करण्याची पद्धत

  • तुमचा ब्राउझर उघडा आणि cybercrime.gov.in ला भेट द्या.

  • मुख्य पेजवर, तक्रार दाखल करा (File a complaint) वर क्लिक करा.

  • पुढील पेजवर अटी आणि शर्ती वाचा आणि स्वीकारा.

  • तुमची सायबर गुन्हेगारी महिला किंवा अल्पवयीन मुलांशी संबंधित असल्यास, 'Report Cyber Crime Related to Women/Child' खाली असलेल्या 'Report And Track' बटणवर क्लिक करा. तुमची तक्रार महिला किंवा मुलाशी संबंधित नसल्यास 'Report Cyber Crime' वर क्लिक करा.

  • 'Citizen Login' पर्याय निवडा आणि नंतर नाव, ईमेल, फोन नंबर इत्यादी आवश्यक माहिती भरा.

  • तुमच्या नोंदणीकृत फोन नंबरवर पाठवलेल्या OTP क्रमांक, CAPTCHA भरून सबमिट बटनवर क्लिक करा.

  • पुढील पेजवर, तुम्ही ज्या सायबर गुन्हेगारीची तक्रार करू इच्छिता त्याची माहिती भरा. फॉर्म चार भागात विभागलेला आहे - गुन्हाचे तपशील, संशयित व्यक्तीचे तपशील, तक्रारदार तपशील आणि पूर्वावलोकन. सर्व संबंधित तपशील भरा आणि माहिती बरोबर आहे याची खात्री करण्यासाठी पूर्वावलोकन करा.

  • पुढील पेजवर, तुमच्याकडे असलेल्या संशयित आरोपीची कोणतीही माहिती भरायची आहे.

आर्थिक फसवेगिरीशी संबंधित तक्रार दाखल करत असाल तर फसव्या व्यवहारांचे पुरावे जोडा. बँक स्टेटमेंट, पत्ते, ओळखपत्र आणि कोणतेही संशयास्पद संदेश किंवा ईमेल यासारखे पुरावे तुमच्या तक्रारीसाठी उपयुक्त ठरतील. स्थानिक पोलिसांना या घटनेची माहिती देणे देखील महत्वाचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hyderabad Gazette: हैदराबाद गॅझेट! बंजारा समाजाला आदिवासींचं आरक्षण कसं मिळेल? नेमका पुरावा काय सापडला?

Vice President election 2025: उपराष्ट्रपती निवडणुकीबाबत मोठी अपडेट! आता ‘या’ दोन पक्षांनी टाकला मतदानावर बहिष्कार

Uran Fire: मोठी बातमी! सरकारच्या ताब्यातील महत्त्वाच्या राष्ट्रीय प्रकल्पात भीषण आग, उरणमध्ये काय घडलं?

Latest Marathi News Updates : मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्यावरून ओबीसी समाज प्रचंड नाराज

Yermala Crime : सोलापूर-धुळे महामार्गावर चालत्या ट्रकमधून दिवसाढवळ्या चोरी करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल; मागील चालकांनी केला प्रतिकार, तरीही चोरटे फरार

SCROLL FOR NEXT