ओटीपीची सुरुवात
ओटीपीची सुरुवात Esakal
विज्ञान-तंत्र

कशी झाली OTP ची सुरुवात? One Time Password सिस्टम काय असते? घ्या जाणून....

Kirti Wadkar

अलिकडे कोणतही ऑनलाईन पेमेंट Online Payment असो किंवा एखाद्या वेबसाईटवर अकाउंट तयार करणं तसचं शासकीय पोर्टलसह इतर महत्वाच्या पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्यासाठी अनेक ठिकाणी ओटीपी OTP चा वापर होतो. Know the Importance and how OTP is started

वाढत्या डिजीटायझेशनमध्ये ओटीपीची OTP भूमिका महत्वपूर्ण आहे. आपण अनेकदा विविध पेमेंट करताना किंवा शॉपिंगच्यावेळी Shopping ओटीपीचा वापर करतो मात्र या ओटीपीची सुरुवात कशी झाली हे तुम्हाला ठाऊक आहे का?

OTP म्हणजेच One Time Password हा एक प्रकारचा सिक्रेट कोड असतो जो ४ अंकी ते ८ अंकापर्यंत असू शकतो. OTP चा वापर ऑनलाईन पेमेंटपासून ऑनलाईन शॉपिंग Online Shopping आणि अनेक ऑनलाईन ट्रान्स्झॅक्शनसाठी होतो.

OTP हा कायम तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर येतो. हा ओटीपी टाकल्यानंतरच तुमचं ट्रान्झॅक्शन पूर्ण होतं. मुळात एक ओटीपी हा एकदाच वापरला जाऊ शकतो. शिवाय या ओटीपीची वेळ मर्यादा ठरलेली असते. वेळ मर्यादा संपल्यास तो ओटीपी वापरला जाऊ शकत नाही. 

काय आहे OTP ची सिस्टम

ओटीपी जनरेट करण्यासाठी सीड Seed आणि मुव्हिंग फॅक्टर Moving Factor या दोन इनपुटचा वापर केला जातो. ज्यावेळी ऑथेंटिकेशन सर्व्हरवर नवं अकाऊंट तयार केलं जातं तेव्हा मुव्हिंग फॅक्टर बदलत असल्याने प्रत्येक वेळी वेगळा ओटीपी आपल्याला मोबाईलवर मिळतो. पेमेंटसाठी किंवा इतर ट्रान्झॅक्शनसाठी हा एक सुरक्षेची खातरजमा करण्यासाठी वापरला जाणारा उत्तम पर्याय आहे. 

हे देखिल वाचा-

OTPचा शोध कुणी लावला?

ओटीपीचा शोध लेसली लॅम्पोर्ट Leslie Lamport यांनी लावला. १९८० दशकामध्ये सर्वप्रथम लेसली यांनी या अल्गोरिदमचा वापर केला होता. यामध्ये Seed आणि Hash Functionचा वापर करण्यात आला होता. 

हे आहेत OTP चे दोन प्रकार

इव्हेंट बेस्ड OTP- HOTP म्हणजेच Hash-Based Message Authentication Code हा एक इव्हेंट बेस्ट ओटीपी आहे. ज्यामध्ये OTP ला कोणतीही वेळ किंवा काळाची मर्यादा नसते. म्हणजेच जोवर तुम्ही नवा ओटीपी जनरेट करत नाहीत तोवर आधीचा ओटीपी Valid राहतो. 

टाइम बेस्ड OTP – हा ओटीपी म्हणजेच वन टाइम पासवर्ड असतो. यासाठी ठराविक कालमर्यादा असते. याला Time step असंही म्हंटलं जातं. ही टाइमस्टेप ३० ते ६० सेकंद असते. जर या वेळेच्या आत ओटीपी वापला नाही तर तो एक्सपायर होतो. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : मुंब्य्रातील बाबाजी पाटील विद्यालयात मतदान सुरूच

Lok Sabha Election 2024 : मतदान केंद्रावरील निवडणूक आयोगाने दिलेल्या सुविधांचा मतदारांना दिलासा

Latest Marathi Live News Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जोरदार पाऊस, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

SCROLL FOR NEXT