अंगावर काटा येणं किंवा शहारे येणं Goose Bumps ही तशी तर एक सामान्य गोष्ट आहे. अनेकदा तुम्ही वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये अंगावर शहारे येण्याचा अनुभव घेतला असेल.
भिती, आनंद Happiness किंवा उत्साहात असताना अनेकदा अंगावर काटे येतात. खरं तर शरीरातील एका विशिष्ट हार्मोनमुळे Hormones अंगावर शहारे येण्याची क्रिया होत असते. Know the science behind the goose bumps on your body
जेव्हा तुम्ही घाबरता किंवा तुम्हाला अचानक मोठा आश्चर्याचा धक्का बसतो तेव्हा शरीरातील स्नायू Body Muscles सैल पडतात. त्यानंतर ते काही काळाने पुन्हा ताणले जातात. यावेळी अंगावर काटे येतात. तर काहींना शरीरावर Body हळुवार किंवा विचित्र स्पर्श झाल्यासही अंगावर काटे येतात.
तसंच अनेकदा एखादी जुनी भयावह घटना आठवूनही अंगावर शहारे येतात. काटे येण्यामागतं कारण नेमकं काय हे आपण जाणून घेऊयात.
थंडी वाजल्यावरही अंगावर येतात शहारे
अनेकदा थंड हवेच्या झुळकेमुळे किंवा थंड वातावरणामुळे Cold Environment देखील अंगावर काटे किंवा शहारे येतात. आपलं शरीर तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी काही बदल घडवून आणत असतं आणि याचाच परिणाम म्हणून अंगावर काटे येतात.
काटे येण्यामाचं वैज्ञानिक कारण
ज्यावेळी शरीरामध्ये ऐड्रेनलिन नावाचा स्ट्रेस हार्मोन रिलीज होतो तेव्हा अंगावर शहारे येतात. जनावरांमध्ये हा हार्मोन त्यांना ठंडी लागल्यावर किंवा ते तणावात असल्यावर रिलीज होतो. माणसांमध्ये मात्र हे हार्मोन्स भीति, ठंडी लागल्यावर, तणावात असताना तसचं भावुक झाल्यावर कधीही रिलीज होऊ शकतात.
ऐड्रेनलिन हार्मोन्स रिलीज झाल्यामुळे अंगावार काटे येण्यासोबत डोळ्यातून अश्रू येणं, हातांना घाम येणं, हात थरथरणे, हार्टबीट वाढणे तसचं ब्लड प्रेशर वाढणं आणि पोटात गोळ्या येणं असे बदलही घडतात. अर्थात वेगवेगळ्या परिस्थितीनुसार शरिरात वेगवेगळे बदल जाणवत असतात.
हे देखिल वाचा-
अंगावर सतत काटे येत असल्यास काय करावं
अंगावर सतत काटे किंवा शहारे येत असल्यास शरीराला हातेने मालिश करून अंगावरचे काटे दूर होवू शकतात. त्यातसोबत ध्यान, व्यायम, योगा आणि मेडिटेशनच्या मदतीने देखील सतत काटे येण्याची समस्या दूर होऊ शकते. ध्यान किंवा मेडिटेशनमुळे शरीर शांत राहतं तसचं मन एकाग्र होत असल्याने हार्मोन्सवर संतुलन राखता येणं शक्य होतं असल्याने शहारे येणं कमी होतं.
याचाच अर्थ शहारे येणं ही शरीराकडून दिली जाणारी एका प्रकारची प्रतिक्रिया आहे. मात्र जर तुम्हाला वारंवार शहारे येत असतील शिवाय त्यासोबत शरीरात इतर बदल जाणवत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणं जास्त योग्य ठरेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.