know what is wifi 7 which offer double speed than wifi 6 check more details on it
know what is wifi 7 which offer double speed than wifi 6 check more details on it  
विज्ञान-तंत्र

Wi-Fi 7 दुप्पट स्पीड देणार, पण Wi-Fi 7 नेमकं आहे काय? जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

Qualcomm ने लवकरच Wi-Fi 6 अपग्रेड करण्याची घोषणा केली आहे. हे अपग्रेड Wi-Fi 7 असून ते नेक्स जनरेशन वायरलेस कनेक्टिव्हिटी स्टँडर्ड आहे. या अपग्रेडनंतर हे दुप्पट इंटरनेट स्पीड देईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे आणि Wi-Fi 6 च्या तुलनेत त्याची लेटन्सी अर्धी असेल.सध्या विकसीत केले जात असलेले हे Wi-Fi 7 नेमके काय आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया…

Wi-Fi 7 ची घोषणा करताना, Qualcomm ने सांगितले की या अपग्रेडमुळे फक्त इंटरनेट स्पीडच वाढणार नाही तर यामुळे लो-लेटंसी परफॉर्मंस देखील सुधारेल. कंपनीने एका ब्लॉग पोस्टमध्ये ही माहिती दिली आहे, ज्यामध्ये सांगितले आहे की, Wi-Fi 7 मधील लेटन्सी, स्पीड आणि परफॉर्मंस सुधारणेमुळे याचा वापर XR, Metaverse, Social Gaming आणि Edge Compute मध्ये केला जाईल.

काय फायदा होईल?

Wi-Fi 7 मध्ये 320 MHz सिंगल-चॅनेल बँडविड्थ वापरली जाईल तर, Wi-Fi 6 मध्ये फक्त 160MHz बँडविड्थ वापरली जाते. अधिक बँडविड्थ असल्याने जास्त डिव्हाईस कनेक्ट करता येतात. कार्यालये, रेस्टॉरंट आणि रेल्वे स्थानकांवर याचा अधिक वापर केला जाईल. त्यात आणखी अनेक फिचर्स पाहायला मिळतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकसभेचा महाराष्ट्ररंग

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 05 मे 2024

IPL 2024 RCB vs GT: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण बेंगळुरूने विजयाचा चौकार मारत प्लेऑफच्या आशाही ठेवल्या जिंवत

कहाणी वेदनादायी आयुष्याची

दलितांच्या जीवनाचं वास्तव चित्रण

SCROLL FOR NEXT