komaki electric cruiser bike
komaki electric cruiser bike टिम ई सकाळ
विज्ञान-तंत्र

लवकरच कोमाकी रेंजर इलेक्ट्रीक क्रुझर बाईक मार्केटमध्ये

सकाळ ऑनलाईन

इलेक्ट्रीक कंपनी कोमाकी (komaki) एक नवीन बाईक लॉन्च करतेय. ही इलेक्ट्रीक क्रूझर बाईक असेल. कोमाकी रेंजर इलेक्ट्रीक क्रुझर असे या बाईकला नाव देण्यात आले आहेत. या बाईकला उत्तम रेंजसह विविध फिचर्स देण्यात येणार असल्याचे कंपनीने सांगितले. हि अत्यंत स्टायलीश अशी बाईक असणार आहे.

कोमाकी रेंजर इलेक्ट्रीक क्रुझर बाईक सिंगल चार्जवर १८० किमी ते २५० किमीची रेंज देणार असून एवढी रेंज देणारी ही भारतातील पहिली इलेक्ट्रीक बाईक असणार आहे. यात रूंद टायर आणि काळ्या अलॉय चाकांसह ड्युअल डिस्क ब्रेक मिळू शकतात. कोमाकी रेंजरला गोल एलईडी हेडलॅम्प्स आणि साईड इंडिकेटर्सही असणार असून जे बाईकला अफलातून लुक देणार आहे. ही इलेक्ट्रीक बाईक ४ kWh बॅटरी पॅकसह आणि पाच हजार वॅट मोटरसह येणार आहे.

कोमाकी रेंजर इलेक्ट्रीक क्रुझर बाईकला रूंद हँडलबार असणार आहे आणि ही बाईक खडतर रस्त्यावर आरामदायी प्रवास करायला सोपी आहे. आरामदायी प्रवाशासाठी मागील सीटवर बॅकरेस्ट बसवण्यात आलाय. सोबत क्रुझ कंट्रोल, रिपेअर स्विच, रिव्हर्स स्विच, ब्लूटूथ आणि अन्य अ‍ॅडव्हान्स्ड फिचर्स या बाईकमध्ये असणार आहे.

कोमाकी रेंजर बाईक क्रूझर डिझाइनवर तयार करण्यात आली असून जी दिसायला खुप आकर्षित आहे. या बाईकची रेंज, फिचर्स आणि एकंदरीत स्ट्रक्चर अफलातून असल्याने या कोमाकी रेंजर इलेक्ट्रीक क्रुझर बाईकची मार्केटमध्ये जोरदार मागणी असणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

IPL 2024 RCB vs GT Live Score: शुभमन गिलही स्वस्तात बाद! गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने धाडले माघारी

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

SCROLL FOR NEXT