koo app  sakal
विज्ञान-तंत्र

‘कू’वर बहुभाषिक वाचनानंद

‘कू’ने अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली.

सकाळ वृत्तसेवा

समाज माध्यमातील नवा पर्याय असलेल्या ‘कू’ने अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली. केवळ मित्र-मैत्रिणी, सहकारी किंवा नातेवाईकांमध्ये संवादापुरता मर्यादित न राहता ‘कू’ने विविधांगी विषयांमध्ये व्यक्त होण्याचीही संधी उपलब्ध केली. त्याचाच विस्तार करत आता ‘कू’ने मराठीसह दहा विविध भाषांमध्ये इन-अॅप ''टॉपिक्स'' फिचर नुकतेच सादर केले.

प्रस्थापित समाज माध्यमांच्या स्पर्धेत २०२०मध्ये ‘कू’ने एन्ट्री केली. विविध क्षेत्रातील लोकांना त्यांच्या क्षेत्रातील लोकांशी सहज कनेक्ट होण्यासोबतच संवादाची नवी परिभाषा ‘कू’ने निर्माण केली. जगभरातील युजर्सना त्यांच्या मातृभाषेत अभिव्यक्त होण्याची संधी देण्याचा ‘कू’चा उद्देश होता. भाषाधारित मायक्रो-ब्लॉगिंगचा नवा पर्याय ‘कू’ने उपलब्ध केला. सध्या ‘कू’ दहा भाषांमध्ये युजर्सना व्यक्त होण्याची संधी देतो. शिवाय तुम्ही लिहिलेला मजकूर त्यातील भावना आणि संदर्भ राखून इतर भाषांमध्ये भाषांतरीत करण्याचीही सुविधा ‘कू’मध्ये आहे. जवळपास ४ कोटी ५० लाखांहून अधिक युजर्स असलेल्या ‘कू’ने राजकारण, क्रीडा, माध्यम, मनोरंजन, अध्यात्म, कला-संस्कृती आदी क्षेत्रातील नामांकित लोकांना त्यांच्या अनुयायांशी संपर्क साधण्‍यासाठी व्यासपीठ उपलब्ध केले आहे.

भाषिक अभिव्यक्तीचा हा प्रयत्न अधिक वृद्धिंगत करण्यासाठी ‘कू’ने दहा विविध भाषांमध्ये इन-अॅप ''टॉपिक्स'' फिचर सादर केले आहे. त्यात हिंदी, बंगाली, मराठी, गुजराती, कन्नड, तमीळ, तेलगू, आसामी, पंजाबी आणि इंग्रजी या भाषांचा समावेश आहे. त्यानुसार युजर्सने त्यांच्या आवडीचा कन्टेन्ट सहजपणे शोधण्यास मदत होईल, तसेच कन्टेक्ट क्रिएटर्सला त्यांच्या क्षेत्रातील युजर्सलाही शोधण्यास मदत करते. उदा. ‘आरोग्य’शी संबंधित बातम्या किंवा माहिती शोधायची असल्यास विशेष टॅबअंतर्गत ‘आरोग्य’ विभागात क्लिक करू शकतात. विशेष कोणत्यावेळी कोणत्या विषयांमध्ये सर्वाधिक युजर्स संभाषण करत आहेत, याबाबतची ट्रेण्ड्सची पाहायला मिळतात.

तंत्रज्ञानाचा वापर

भारतातील दहा विविध भाषांमधील टॉपिक्स हे फीचर मशिन लर्निंग आणि नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग (एनएलपी) तंत्रज्ञानाच्या साह्याने विकसित करण्यात आले आहे. आतापर्यंत भारतीय भाषांमधील नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग इंग्रजीच्या तुलनेत फारशी प्रभावी नव्हती; मात्र ‘कू’ने नवसंशोधन करत विविध भारतीय भाषांमध्ये हे फीचर आणले. त्यासाठी लार्ज लँग्वेज मॉडेल्स आणि न्यूरल नेटवर्क आर्किटेक्चर्सवर काम केले.

कूवरील काही महत्त्वाचे टॉपिक्स

  • आरोग्य

  • शिक्षण

  • पर्यावरण

  • चित्रपट

  • क्रीडा

  • इस्रो

  • आयएमएफ

दहा भाषांमध्ये टॉपिक्सची सुविधा

  • हिंदी

  • बंगाली

  • मराठी

  • गुजराती

  • कन्नड

  • तमीळ

  • तेलगू

  • आसामी

  • पंजाबी

  • इंग्रजी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar Price Hike Maharashtra : साखरेचे भाव क्विंटलमागे 900 रुपयांनी घसरले; तरीही किरकोळ बाजारात दर 67 रुपयांवर, फायदा साठेबाजांचाच?

कोकण आपलोच आसा! सनई चौघडे मालिकेची टीम पोहचली कणकवलीत, फोटो पाहिलेत का?

MPSC Paper Leak: परीक्षा झाली, मुलाखतीही झाल्या; मग MPSC ने संपूर्ण भरतीच का रद्द केली? पेपरफुटीचा मुद्दा पुन्हा चर्चेत

Latest Marathi News Live Update : टीम कुक ‘ॲपल’ची धुरा सोडणार

Kolhapur Gender Determination Case: गर्भलिंग निदानप्रकरणी ‘एस.पी. टोळी’ला मोका; राज्यातील पहिलीच कारवाई; ११ जणांवर बडगा

SCROLL FOR NEXT