KTM RC 390 2022
KTM RC 390 2022 Sakal
विज्ञान-तंत्र

KTM RC 390 चे नवीन मॉडेल लाँच; जाणून घ्या किंमत अन् वैशिष्ट्ये

सकाळ डिजिटल टीम

KTM बाईक भारतात खूप पसंत केल्या जातात. कंपनीने अलीकडेच आपल्या आरसी 390 बाईकचं न्यू जनरेशन (New Generation RC 390) मॉडेल लॉन्च केलं आहे. कंपनीने या बाईकला पूर्णपणे नव्या डिझाइनसह लाँच करण्यात आले आहे.

या नवीन बाईकच्या फ्रंट फेअरिंगला एक मोठा एलईडी हेडलॅम्प आणि दोन्ही बाजूंना एलईडी डीआरएल इंडिकेटर देण्यात आले आहेत. नवीन KTM RC 390- 2022 मॉडेल ट्रॅक्शन कंट्रोल, सुपरमोटो मोडसह लीन अँगल सेन्सिटिव्ह कॉर्नरिंग ABS, अँटी-हॉपिंग स्लिपर क्लच आणि TFT डिस्प्ले या वैशिष्ट्यांसह येते.

बाईकला समोर USD फॉक्स आणि आरामासाठी मागील बाजूस अ‍ॅडजस्टेबल मोनोशॉक सस्पेंशन आहे. सर्वोत्तम ब्रेकिंग परफॉर्मन्ससाठी, याला 320mm फ्रंट आणि 280mm रियर डिस्क ब्रेक मिळतो जो ड्युअल चॅनल ABS सह येतो. KTM RC 390 2020 (KTM RC 390) बाइक मॉडेल KTM द्वारे माय राइड नेव्हिगेशन अॅपला देखील सपोर्ट करते.

KTM RC 390 चे शक्तिशाली इंजिन:

नवीन KTM RC 390 मध्ये पूर्वीचंच इंजिन देण्यात आले आहे, ज्यामध्ये 373 cc लिक्विड कूल्ड सिंगल सिलेंडर इंजिन उपलब्ध होते. हे इंजिन 43.5 PS पॉवर आणि 37 Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 6-स्पीड ट्रान्समिशन गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. ही बाईक पूर्वीपेक्षा जास्त टॉर्क देते, असा दावा KTM कंपनीनं केला आहे.

KTM 250 Adventure:

केटीएमने (KTM) सोमवारी त्यांच्या RC 390 चे 2022 मॉडेल लॉन्च केल्याची घोषणा केली. तिची किंमत 3,13,922 रुपये (एक्स-शोरूम) असणार आहे. त्याचवेळी, देशभरातील सर्व KTM शोरूममध्ये या बाइकची आगाऊ बुकिंग सुरू झाली आहे. KTM ने 2014 मध्ये पहिले RC 390 मॉडेल लाँच केले होते.

लॉन्च झाल्यानंतरच भारतीय बाजारपेठेत या बाईकने धुमाकूळ घातला. बजाज मोटर्स हे या कंपनीचे भारतातील वितरक आहेत आणि बजाज ऑटो लिमिटेडचे ​​अध्यक्ष सुमित नारंग म्हणाले की, ही नवीन पिढीची बाइक बाईकप्रेमींना प्रीमियम फील देण्यास पूर्णपणे सक्षम आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rally: पुतिन जसं विरोधकांना संपवतात, तसाच प्रयत्न मोदींकडून सुरु; अरविंद केजरीवाल यांचा घणाघात

Mega Block : रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल!

Microsoft linkedin Work Trend: भारतातील किती टक्के कर्मचारी कामाच्या ठिकाणी AI चा वापर करतात?

Karad News : कऱ्हाड बाजार समितीत कोल्हापूरच्या शेतकऱ्याच्या गुळाने खाल्ला भाव; क्विंटलला मिळाला 'इतका' उच्चांकी दर..

Latest Marathi News Live Update: मुंबईसाठी महाविकास आघाडीनं काय केलं? फडणवीसांचा सवाल

SCROLL FOR NEXT