Lamborghini car Sakal
विज्ञान-तंत्र

Lamborghini Car: ४ कोटींची सुपरकार भारतात लाँच, वेगाच्याबाबतीत खूपच दमदार; टॉप स्पीड ३०६kmph

Lamborghini ची सुपरकार भारतात लाँच झाली आहे. या कारमध्ये पॉवरफुल इंजिन देण्यात आले असून, वेगाच्याबाबतीत खूपच दमदार आहे.

सकाळ डिजिटल टीम

Lamborghini Urus Performante Launched: Lamborghini ने भारतीय बाजारात आपली नवीन लग्झरी कार Urus Performante ला लाँच केले आहे. भारतीय बाजारात या कारची किंमत ४.२२ कोटी रुपये आहे. या कारला आयसी इंजिनसह लाँच करण्यात आले आहे. ही सुपरकार अवघ्या ३.३ सेकंदात ताशी ० ते १०० किमीचा वेग पकडते. याचा टॉप स्पीड ताशी ३०६ किमी आहे.

Urus ला ग्राहकांची पसंती

डिसेंबर २०१७ मध्ये कंपनीने Urus चे पहिले मॉडेल लाँच केले होते. लाँचनंतर या सुपरकारला लोकांची मोठ्याप्रमाणात पसंती मिळाली होती. भारतात या कारला वर्ष २०१८ मध्ये लाँच करण्यात आले होते. याचे आकर्षक डिझाइन, जबरदस्त एरोडायनॅमिक्स आणि यात देण्यात आलेल्या लाइनव्हेट कंपोनेंटमुळे ही कार लोकप्रिय झाली होती. कंपनीने पुढील मॉडेलमध्ये नवनवीन बदल करत लोकांना चांगला अनुभव देण्याचा प्रयत्न केला आहे.

हेही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

आकर्षक डिझाइनसह येते Lamborghini Urus Performante

कारच्या डिझाइनबद्दल सांगायचे तर यात एक्सटेंसिव्ह कार्बन बॉडीचा वापर करण्यात आला आहे. याचे बोनट कार्बन फायबरचे आहे. बोनटवर डीप शार्प कट दिला आहे. याशिवाय, नवीन बंपर आणि रीडिजाइन करण्यात आलेले एअर वेंट्स देखील आहेत, ज्यामुळे लूक अजूनच आकर्षक वाटतो.

कारमध्ये नवीन एरोडायनॅमिक्स एलॉल देण्यात आले आहेत, ज्यात २२ आणि २३ इंचाचा पर्याय मिळेल. यात स्पेशल पिलेरी पी झिरो टायर्सचा वापर करण्यात आला आहे. रुफमध्ये कार्बन फायबरचा पर्याय मिळेल. पुढील बाजूला अल्ट्रा लाइट टायटेनियम एग्जॉस्टचा बदल करण्यात आला आहे. तसेच, साउंडमध्ये देखील सुधारणा केली आहे.

परफॉर्मेंसमध्ये जबरदस्त आहे कार

या कारला परफॉर्मेंससाठी ओळखले जाते. यात ४.० लीटरचे ट्विन टर्बोचार्ज्ड व्ही८ इंजिन दिले आहे. Urus च्या स्टँडर्ड मॉडेलमध्ये ६५० एचपी मॅक्सिमम पॉवर मिळते. तर नवीन मॉडेल ६६६एचपी मॅक्सिमम पॉवर जनरेट करते. Urus S मध्ये देखील हीच पॉवर मिळते. Urus Performante चे इंजिन ८५० एनएम पीक टॉर्क जनरेट करते.

Lamborghini Urus Performante कार अवघ्या ३.३ सेकंदात ० ते १०० किमीचा वेग पकडते. तर यासाठी Urus च्या स्टँडर्ड मॉडेलला यासाठी ३.६ सेकंद आणि Urus S मॉडेलला ३.६ सेकंद लागतात. Performante चा टॉप स्पीड ताशी ३०६ किमी, तर Urus आणि Urus S चा टॉप-स्पीड ताशी ३०५ किमी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT