Laptop care google
विज्ञान-तंत्र

Laptop care : तुमचा लॅपटॉप खूप गरम होतोय का ? मग हे उपाय करा...

लॅपटॉपची थोडीशी उष्णता ही समस्या नसली तरी जास्त गरम होण्यामुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते.

नमिता धुरी

मुंबई : व्यवसाय, शिक्षण आणि कार्यालयीन कामासाठी आपण अनेकदा लॅपटॉप वापरतो. कोरोनामुळे लॅपटॉपचा वापर घरातून कामासाठी आणि ऑनलाइन अभ्यासासाठीही मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. अनेक तास वापरल्यानंतर, लॅपटॉप खूप गरम होतो आणि यामुळे त्याच्या कार्यक्षमतेवर देखील परिणाम होतो.

लॅपटॉपची थोडीशी उष्णता ही समस्या नसली तरी जास्त गरम होण्यामुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. जर तुम्हीही लॅपटॉप लवकर गरम होण्याच्या समस्येने त्रस्त असाल तर यावर कशी मात करायची हे पाहू या...

लॅपटॉपचे धुळीपासून संरक्षण करा

लॅपटॉपच्या आत वायुवीजन आणि उष्णता नियंत्रित करण्यासाठी CPU पंखे असतात. कालांतराने आणि योग्य देखभालीअभावी त्याच्या पात्यांवर भरपूर धूळ साचते. अशा परिस्थितीत लॅपटॉपच्या आत वायुवीजन व्यवस्थित होत नाही. यामुळे ते गरम होऊ लागते.

अशा स्थितीत लॅपटॉपमधील धूळ साफ करावी. यामुळे वायुवीजन सुधारेल आणि CPU पंखे उष्णता नियंत्रणात ठेवतील. लॅपटॉपमधील धूळ साफ करण्यासाठी तुम्ही लॅपटॉप इंजिनिअरची मदत घेऊ शकता. याशिवाय, जर तुम्हाला लॅपटॉप हार्डवेअरचे चांगले ज्ञान असेल, तर तुम्ही सॉफ्ट ब्रशच्या मदतीने सीपीयू आणि कुलिंग सिस्टममध्ये साचलेली धूळ स्वतः साफ करू शकता.

तुमचा लॅपटॉप सारखा चार्जर वापरा

अनेक वेळा आपण आपला लॅपटॉप इतर एखाद्या चार्जरने चार्ज करतो. या परिस्थितीत, तो जास्त गरम होण्याची शक्यता खूप वाढते आणि लॅपटॉपमध्ये अनेक समस्या देखील उद्भवू शकतात. तुमचा लॅपटॉप नेहमी त्याच्याच चार्जरने चार्ज करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maha Livestock Insurance Scheme: पशुधन विम्याचा भार होणार हलका; ८५ टक्के अनुदानावर मिळणार विमा

शूटिंगच्या पहिल्या दिवशी मृणाल दुसानिस खूप रडलेली, 'माझिया प्रियाला...' मालिकेबद्दल बोलताना म्हणाली; “ आईकडे पाहत मी रडत होते”

RTOने दंडात्मक कारवाईनंतर कागदपत्रे बराच वेळ दिली नाही, चालकानं समृद्धीवर ट्रकच आडवा लावला; वाहतूक तासभर ठप्प, VIDEO VIRAL

Marathi News Live Updates : गृहमंत्री अमित शहा संसदेत निवेदन देणार? 'या' 2 मोठ्या मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक, अधिवेशनाचा शेवटचा आठवडा ठरणार वादळी!

BMC: नगरसेवकांना 'अ‍ॅपल'चे टॅब, महापालिकेचा कारभार आता कागदमुक्त होणार

SCROLL FOR NEXT