latest 5g smartphone launch infinix zero 5g smartphone launched in india  see price and features
latest 5g smartphone launch infinix zero 5g smartphone launched in india see price and features 
विज्ञान-तंत्र

Infinix Zero 5G फोन भारतात लॉंच; तुमच्या बजेटमध्ये बसेल किंमत

सकाळ डिजिटल टीम

Infinix Zero 5G स्मार्टफोन लॉन्च झाला आहे. 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनची किंमत 19,990 रुपये असून कंपनीच्या या पहिल्या 5G स्मार्टफोनची विक्री 18 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजल्यापासून सुरू होईल आणि तुम्ही तो फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकाल. फोनमध्ये, कंपनी 48 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि 33 डब्ल्यू फास्ट चार्जिंगसह अनेक दमदार फीचर्स देत आहे. चला तर मग जाणून घेऊया Infinix च्या या नवीन फोनमध्ये काय खास आहे.

Infinix Zero 5G चे फीचर आणि स्पेसिफिकेशन

फोनमध्ये, कंपनी 2460x1080 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.78-इंच फुल एचडी + डिस्प्ले देत आहे. हा डिस्प्ले 20.5:9 चा अस्पेक्ट रेशो आणि 120Hz च्या रीफ्रेश रेटसह येतो. डिस्प्लेचा टच सॅम्पलिंग रेट 240Hz आहे आणि तुम्हाला 500 nits चा पीक ब्राइटनेस मिळेल. कंपनीने हा फोन 8GB LPDDR5 रॅम आणि 128GB UFS 3.1 स्टोरेजसह लॉन्च केला आहे.

5 जीबी पर्यंत व्हर्च्युअल रॅम फीचरसह येणाऱ्या या फोनमध्ये प्रोसेसर म्हणून MediaTek Dimensity 900 चिपसेट दिला जात आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 48-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेल डेप्थ सेन्सरसह 13-मेगापिक्सेल टेलिफोटो युनिट समाविष्ट आहे.

त्याचबरोबर सेल्फीसाठी या फोनमध्ये तुम्हाला 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरसह सुसज्ज, या फोनला 5000mAh बॅटरी सपोर्ट दिला आहे, जो 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. OS बद्दल बोलायचे झाले तर हा फोन Android 11 वर आधारित XOS 10 वर काम करतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: सुनील नारायणचं शानदार अर्धशतक; कोलकाता 100 धावा पार

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT