Poco C40 google
विज्ञान-तंत्र

पावसाळ्यासाठी खास Waterproof स्मार्टफोन लॉन्च

Poco C40 वर कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 4G, ब्लूटूथ 5, ड्युअल-बँड वाय-फाय आणि ड्युअल-सिम कार्ड स्लॉट समाविष्ट आहे.

नमिता धुरी

मुंबई : चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Poco ने जागतिक बाजारात नवीन फोन Poco C40 लाँच केला आहे. कंपनीच्या या नवीन स्मार्टफोनमध्ये 6,000mAh बॅटरी, डीप कॅमेरा आणि पॉवरफुल प्रोसेसर आहे. चला तर मग या स्मार्टफोनबद्दल सविस्तर माहिती घेऊ.

Poco C40 किंमत

Poco C40 ची अधिकृत किंमत अद्याप समोर आलेली नाही. कंपनीचे म्हणणे आहे की उपलब्धता तपशील आणि किमतीची माहिती लवकरच शेअर केली जाईल.

3GB रॅम आणि 32GB स्टोरेज, 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज या दोन प्रकारांत फोन लॉन्च करण्यात आला आहे. ग्राहकांना काळा, पिवळा आणि हिरवा असे तीन रंगांचे पर्याय मिळतील. सध्या, Poco कंपनी भारतात Poco C31 ७ हजार ४९९ रुपयांना विकत आहे.

Poco C40 ची वैशिष्ट्ये

यात HD + रिझोल्यूशनसह मोठा 6.71-इंचाचा डिस्प्ले समाविष्ट आहे. शिवाय, फोनला धूळ आणि पाण्याच्या प्रतिकारासाठी IP52 रेटिंग मिळते. स्मार्टफोनमधील फोटोग्राफीसाठी, 13-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा आणि 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर उपलब्ध आहे. सेल्फीसाठी, स्मार्टफोनमध्ये 5-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे, जो 30fps वर फुल-एचडी व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो. मागील कॅमेरा मॉड्यूलमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर देखील आहे.

Poco C40 वर कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 4G, ब्लूटूथ 5, ड्युअल-बँड वाय-फाय आणि ड्युअल-सिम कार्ड स्लॉट समाविष्ट आहे. स्मार्टफोनच्या टॉप स्पाइनवर 3.5mm ऑडिओ जॅक देखील आहे. Poco C40 मध्ये 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6,000mAh बॅटरी आहे. स्मार्टफोनमध्ये प्रोसेसर म्हणून ऑक्टा-कोर JLQ JR510 SoC वापरण्यात आला आहे. त्याचे वजन सुमारे 204 ग्रॅम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

Bank of Baroda Recruitment: पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ बड़ौदामध्ये 2500 पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, निवडपद्धत आणि वेतन

Pune Kondhwa Rape Case : पुणे 'कुरियर बॉय' बलात्कार प्रकरण; आरोपीस अटक अन् धक्कादायक माहितीही उघड!

IND vs ENG 2nd Test: २४ वर्षांच्या पोराचे शतक! जेमी स्मिथ-हॅरी ब्रूक्सच्या खेळीने इंग्लंडचा पलटवार; गौतम गंभीरचा फसला प्लॅन

SCROLL FOR NEXT