Lava Mobile Tricolor Flag eSakal
विज्ञान-तंत्र

Lava Mobile Tricolor Flag : 1,206 मोबाईलच्या माध्यमातून तयार केला तिरंगा! अनोख्या विक्रमाची गिनिज बुकमध्ये नोंद

Lava Guinness World Record : हा विक्रम आपल्यासाठी अभिमानाची बाब असल्याचं लाव्हा इंटरनॅशनल कंपनीचे अध्यक्ष आणि बिझनेस हेड सुनील रैना यांनी सांगितलं.

Sudesh

Independence Day : देशाचा स्वातंत्र्यदिन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठपला आहे. यानिमित्ताने देशभरात उत्साहाचं वातावरण दिसत आहे. स्वातंत्र्यदिनापूर्वी स्वदेशी मोबाईल कंपनी लाव्हाने एका अनोख्या अंदाजात राष्ट्रध्वज तयार करुन नवा विक्रम केला.

नोएडामध्ये लाव्हा कंपनीने 1,206 मोबाईलच्या मदतीने एक अ‍ॅनिमेटेड राष्ट्रध्वज तयार केला. अशा प्रकारचा हा जगातील सर्वात मोठा ध्वज असल्यामुळे याची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही करण्यात आली. हा 'डिजिटल मोझॅक' तिरंगा बनवण्यासाठी कंपनीने Lava Blaze 2 या स्मार्टफोनचा वापर केला.

हा विक्रम करणं आपल्यासाठी अभिमानाची बाब असल्याचं लाव्हा इंटरनॅशनल कंपनीचे अध्यक्ष आणि बिझनेस हेड सुनील रैना यांनी सांगितलं. देशाच्या 77व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आदरांजली म्हणून, तसेच 'लाव्हा अग्नि 2'चं यश साजरं करण्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे. भारतीय उत्पादनंही जागतिक तोडीची असतात, हे या मोबाईलने सिद्ध केलं आहे.

कंपनीची 53% वाढ

स्वदेशी मोबाईल कंपनी असलेल्या लाव्हाची नोएडामध्ये एक मोठी फॅक्टरी आहे. 31 ऑगस्ट 2021 पर्यंत याठिकाणी दरवर्षी सुमारे 42 मिलियन फीचर फोन तयार होत होते. कंपनीने कित्येक स्मार्टफोन देखील लाँच केले आहेत. Lava Agni 2, Lava Blaze 5G आणि Lava Yuva 2 Pro असे कंपनीचे काही प्रसिद्ध स्मार्टफोन आहेत. लाव्हा कंपनीची 2023 च्या दुसऱ्या तिमाहीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 53 टक्के वाढ दिसून आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईत विजांसह ढगांचा गडगडाट! पुढील ३ तास महत्त्वाचे, हवामान विभागाचा 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट

Latest Marathi News Updates : आचार्य देवव्रत यांनी घेतली महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ

Asia Cup 2025 Point Table : टीम इंडिया Super 4 मध्ये पोहोचली! पाकिस्तानला काय करावं लागेल?; ब गटात आघाडीसाठी मारामारी

Whatsapp Threaded Reply : व्हॉट्सअ‍ॅपमध्ये आणखी एका भन्नाट फीचरची एन्ट्री! हे नेमकं कसं वापरायचं? पाहा एका क्लिकवर

Khadakwasla Dam Update : खडकवासला धरण विसर्ग सध्या १४ हजार ५४७ क्यूसेक; २० हजार क्युसेक होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT