Allahabad HC eSakal
विज्ञान-तंत्र

Allahabad HC : सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट लाईक करणे गुन्हा नाही; हायकोर्टाचा निर्वाळा

आग्र्यातील मोहम्मद इम्रान काझी यांच्या याचिकेवर सुनावणी सुरू असताना कोर्टाने हे स्पष्टीकरण दिलं.

Sudesh

सोशल मीडियावर एखादी आक्षेपार्ह पोस्ट लाईक करणे हा गुन्हा नसल्याचा निर्वाळा अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे. अर्थात, अशा प्रकारची पोस्ट शेअर किंवा रिपोस्ट करणे मात्र माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 67 अंतर्गत दंडात्मक कृत्य असणार आहे; असंही न्यायालयाने स्पष्ट केलं.

आग्र्यातील मोहम्मद इम्रान काझी यांच्या याचिकेवर सुनावणी सुरू असताना कोर्टाने हे स्पष्टीकरण दिलं. या व्यक्तीने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट लाईक केली होती. त्यामुळे त्याच्यावर आयटी कायद्याच्या कलम 67 आणि भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) इतर कलमांखाली फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. हायकोर्टाने निर्णय देत ही कारवाई रद्द केली.

न्यायमूर्ती देशवाल म्हणाले, “माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 67 अंतर्गत हे स्पष्ट आहे, की अश्लील साहित्य प्रकाशित करणे किंवा प्रसारित करणे हा गुन्हा आहे. एखादी पोस्ट किंवा संदेश पोस्ट केल्यावर प्रकाशित झाला असे म्हटले जाऊ शकते आणि पोस्ट किंवा संदेश शेअर किंवा री-ट्विट केल्यावर प्रसारित केला म्हटलं जाऊ शकतं."

"सध्याच्या प्रकरणात, असा आरोप आहे की अर्जदाराने फरहान उस्मान नावाच्या व्यक्तीने केलेली पोस्ट लाईक केली आहे, परंतु पोस्ट लाइक करणे हे पोस्ट प्रकाशित करणे किंवा प्रसारित करणे नाही, तर केवळ पसंत करणे आहे. त्यामुळे केवळ एखादी पोस्ट लाईक करणे हा आयटी कायद्याअंतर्गत गुन्हा म्हणता येणार नाही." असं न्यायमूर्तींनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kapil Sibal on Supreme Court: सर्वोच्च न्यायालयावरच प्रश्नचिन्ह! कपिल सिब्बल स्पष्टच बोलले; "आता कोर्टात जाण्यात अर्थ नाही, विश्वास उडाला!"

Maharashtra Live News : अभिजीत दिपकेंच्या आजीचे अंत्यसंस्कार थांबवले; आईंचा दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप

YCM Hospital Incident : धक्कादायक ! पिंपरी-चिंचवडमध्ये धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण रस्त्यावर पडला; वायसीएम रुग्णालयातील प्रकार, VIDEO VIRAL

Navratri Festival : आदिमायेच्या उत्सवाला प्रारंभ;घटस्थापनेसाठी दुपारी दीड वाजेपर्यंत मुहूर्त

Tuljabhavani Temple: तुळजापूरला नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण ;तुळजाभवानी मातेच्या मंदिरात आज घटस्थापना

SCROLL FOR NEXT