LinkedIn AI Coach eSakal
विज्ञान-तंत्र

LinkedIn AI Coach : आता लिंक्डइनवर नोकरी शोधणं अन् अप्लाय करणं होणार सोपं; एआय टूल करणार मदत

LinkedIn AI tool : यूजर्सचा अनुभव अधिक चांगला करण्यासाठी या फीचरची चाचणी सुरू आहे.

Sudesh

Job Searching AI : नोकरी शोधण्यासाठी कित्येक ऑनलाईन प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. यांपैकी लिंक्डइन ही एक लोकप्रिय वेबसाईट आहे. आपल्या यूजर्सना नोकरी शोधणं आणि अप्लाय करणं या प्रक्रिया अधिक सुलभ व्हाव्यात यासाठी आता ही कंपनी प्रयत्न करत आहे. यासाठी ही कंपनी आता एआयची मदत घेणार आहे.

लिंक्डइन कोच

कंपनी सध्या 'लिंक्डइन कोच' नावाच्या एआय फीचरवर काम करत आहे. हे एआय टूल आपल्या यूजर्सना सर्व प्रकारची मदत करणार आहे. नवीन नोकऱ्या शोधणं, नोकरीसाठी अर्ज करणं, नोकरीसाठी नवीन कौशल्य आत्मसात करणं, आपलं नेटवर्क बिल्ड करणं अशा सर्व गोष्टींसाठी हे टूल मदत करेल. अ‍ॅप रिसर्चर असणाऱ्या नीमा ओवजी यांनी या फीचरची माहिती दिली आहे.

लिंक्डइनच्या प्रवक्त्या अमँडा पुर्विस यांनी या टूलचे आधीच संकेत दिले होते. 'यूजर्सचा अनुभव अधिक चांगला करण्यासाठी कंपनी नेहमीच नवनवीन गोष्टींच्या शोधात असते. लवकरच आम्ही यूजर्ससाठी भरपूर गोष्टी आणणार आहोत.' असं त्या म्हणाल्या होत्या. (LinkedIn AI tool)

एआयचं खास फीचर

आपल्यापैकी बऱ्याच जणांना स्वतःबद्दल नेमकं काय लिहायंच हेच कळत नाही. यासाठी एका एआय चॅटबॉटची चाचणी लिंक्डइन करत आहे. हा चॅटबॉट एखाद्या यूजरबद्दल क्षणात माहिती लिहून काढेल. यूजर्स नंतर ही माहिती पोस्ट स्वरुपात आपल्या नेटवर्कसोबत शेअर करू शकतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वडिलांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारच केले नाहीत; मृतदेह प्रिझर्व्ह करून ठेवला, मुंबईतील खळबळजनक घटना

Malvan Accident : दुचाकीच्या धडकेत भाजप नगरसेविकेसह चौघे जखमी, सरकारी दवाखान्यात एक्स रे मशीन बंद असल्याने संताप

LPG Cylinder Price: उद्यापासून गॅस सिलेंडर महागणार? महाराष्ट्रात आज कितीला मिळतो LPG, पाहा शहरनिहाय दर

Pradip Purnekar case: ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याच्या हत्येचा CCTV फुटेज समोर, ७ गोळ्या झाडल्याचा आवाज

Ayush Thite Organ Donation : सोलापूरच्या आयुषच्या हृदयाने रशियातील तीन वर्षांच्या चिमुकल्याला मिळणार नवजीवन; अवयवदानाने वाचणार चौघांचे प्राण

SCROLL FOR NEXT