LinkedIn Games
LinkedIn Games eSakal
विज्ञान-तंत्र

LinkedIn Games : जॉब सर्च करता करता होणार नाही बोअर.. लिंक्ड इनवर आता खेळता येणार गेम

Sudesh

LinkedIn to Introduce Games on Platform : नोकरी शोधण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पोर्टल्समधील अग्रगण्य नाव म्हणजे लिंक्ड इन. जगभरातील एक बिलियनहून अधिक लोक याचा वापर करतात. आपल्या यूजर्सची एंगेजमेंट वाढवण्यासाठी आता लिंक्ड इनवर गेम्स इंट्रोड्यूस करण्यात येणार आहेत.

अ‍ॅप रिसर्चर निमा ओवजी यांनी याबाबत आपल्या एक्स हँडलवरुन याबाबत माहिती दिली आहे. लिंक्ड इन आपल्या अ‍ॅपमध्ये पझल गेम्स देण्याच्या तयारीत असल्याचं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. वेगवेगळ्या कंपन्यांना आपल्या एम्प्लॉईजनी खेळलेल्या गेम्सच्या स्कोअरवरुन रेटिंग मिळणार आहे, असंही त्या म्हणाल्या.

टेक क्रंचने दिलेल्या रिपोर्टनुसार, लिंक्डइनच्या एका प्रवक्त्याने देखील याची पुष्टी केली आहे. अर्थात, निमा यांनी शेअर केलेले फोटो हे जुने असल्याचंही त्याने स्पष्ट केलं. रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार 'क्वीन्स', 'इनफरन्स' आणि 'क्रॉसक्लाईम्ब' असे गेम्स याठिकाणी पहायला मिळतील. या गेम्स कधी लाँच होतील याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

"लिंक्ड इनवर आम्ही पझल गेम्स आणायचा विचार करत आहे. यामुळे अ‍ॅपवर आणखी मजा येईल. तसंच लोकांना एकमेकांशी बोलण्यासाठी संधी उपलब्ध होईल, आणि त्यांना आपलं नातं अधिक घट्ट करता येईल." असं या प्रवक्त्याने सांगितलं.

इन्स्टावरही आली गेम

दरम्यान इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अ‍ॅपवर देखील एक गेम लाँच करण्यात आली आहे. एखाद्या इनबॉक्समध्ये समोरच्या व्यक्तीला इमोजी पाठवून, त्यावर टॅप करून हा गेम खेळता येतो. अल्पावधीतच हा गेम भरपूर पॉप्युलर झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे माजी आमदार वसंत गीतेंमध्ये वाद; बूथवर उडाला गोंधळ

IPL 2024: 'मला फक्त शेवटची संधी द्या...', RCB कडून खेळणाऱ्या स्वप्नील सिंगला व्यक्त होताना अश्रु अनावर

Pune Rain Updates : पुण्यात वादळी वाऱ्यासह पाऊस! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

SCROLL FOR NEXT