Solar Eclipse 2024 eSakal
विज्ञान-तंत्र

Solar Eclipse 2024 : तब्बल 54 वर्षांनंतर होणार खास सूर्यग्रहण; 'आदित्य एल-1'वर काय होणार परिणाम? जाणून घ्या

भारतीय वेळेनुसार रात्री 9 वाजून 12 मिनिटांनी हे ग्रहण लागेल. भारतात हे ग्रहण दिसणार नसलं, तरी अंतराळात असणारी भारताची प्रयोगशाळा 'आदित्य एल-1' वर याचा काय परिणाम होईल? जाणून घेऊया.

Sudesh

Solar Eclipse effect : यावर्षीचं पहिलं सूर्यग्रहण आज, म्हणजेच आठ एप्रिल रोजी पार पडेल. गुढीपाडव्याच्या एक दिवस आधी होणाऱ्या या सूर्यग्रहणाचा प्रभाव संपूर्ण जगावर पडेल. हे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही. कॅनडा, अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेतील काही देशांमधून हे पूर्ण सूर्यग्रहण पाहता येईल. युरोपातील काही देशांमध्ये आंशिक सूर्यग्रहण दिसेल.

तब्बल 54 वर्षांनंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या वेळेसाठी पूर्ण सूर्यग्रहण (Total Solar Eclipse) होणार आहे. यावेळी सुमारे सात मिनिटांसाठी पूर्णपणे अंधार होईल. भारतीय वेळेनुसार रात्री 9 वाजून 12 मिनिटांनी हे ग्रहण लागेल. भारतात हे ग्रहण दिसणार नसलं, तरी अंतराळात असणारी भारताची प्रयोगशाळा 'आदित्य एल-1' वर याचा काय परिणाम होईल? जाणून घेऊया.

काय आहे आदित्य एल-1?

भारताची अंतराळ संशोधन संस्था इस्रोने गेल्या वर्षी 'आदित्य' (Aditya L1) हा उपग्रह लाँच केला होतं. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी पाठवण्यात आलेला हे भारताचं पहिलाच उपग्रह आहे. सुमारे चार महिन्यांचा प्रवास करून हा उपग्रह एल-1 या लॅग्रेंज पॉइंटवर पोहोचला होता. तिथून तो सातत्याने सूर्याचं निरीक्षण आणि अभ्यास करत आहे.

'आदित्य'ला नाही दिसणार सूर्यग्रहण

सूर्यग्रहण (Solar Eclipse) तेव्हा होतं, जेव्हा पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये चंद्र येतो. आदित्य हा उपग्रह अशा ठिकाणी ठेवण्यात आला आहे, जिथून त्याच्या आणि सूर्याच्या मध्ये कोणताही दुसरा उपग्रह किंवा ग्रह येणार नाही. सूर्याचा अविरत अभ्यास करता यावा यासाठीच आदित्यला याठिकाणी ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे हे सूर्यग्रहण आदित्यला दिसणार नाही. तसंच, आदित्य उपग्रहावर या सूर्यग्रहणाचा काही परिणाम होणार नाही.

नासा करणार अभ्यास

दरम्यान, अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था 'नासा' (NASA) या सूर्यग्रहणाचा अभ्यास करण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाली आहे. केवळ नासाच नाही, तर अमेरिकेतील कित्येक रिसर्चर्स आणि हौशी लोक सूर्यग्रहण पाहण्यासाठी आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी सज्ज झाले आहेत. कित्येक ठिकाणी लोक एकत्र येऊन हे सूर्यग्रहण पाहतील. तर नासाचं एक विशेष जेट विमान या सूर्यग्रहणाच्या सावलीचा पाठलाग देखील करणार आहे. (NASA Jet Tracking Eclipse)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Martyr constable pension case: हुतात्मा जवानाच्या आईला पेन्शन नाकारली! उच्च न्यायालयाने दिले महत्त्वाचे आदेश

Pune Crime : येरवड्यात दारू पिताना वाद, लाकडी दांडक्याने मित्राचा खून

Maha Shivratri 2026 Travel Tips: महाशिवरात्रीला महादेवाच्या प्रसिद्ध मंदिरांना भेट द्यायला जाताय? मग 'या' 5 गोष्टी नक्की लक्षात ठेवा

RBI Rule: महत्त्वाची बातमी! आता १००% सुरक्षित निधीच मान्य; असुरक्षित हमींना पूर्णविराम, ब्रोकर्ससाठी आरबीआयचे कडक नियम लागू

Maha Shivratri 2026: भगवान भोलेनाथांकडून जीवनातील 'या' 4 महत्त्वाच्या गोष्टी शिका, कधीच येणार नाही अपयश

SCROLL FOR NEXT