LPG Cylinder Price
LPG Cylinder Price e sakal
विज्ञान-तंत्र

LPG सिलेंडर बुकिंगवर 2700 पर्यंत कॅशबॅक; Paytm ची खास ऑफर

सकाळ डिजिटल टीम

Paytm LPG Gas Booking Offer : गेल्या काही वर्षांत गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सर्व सामान्यांवर अतिरिक्त आर्थिक बोजा पडला आहे. अशा परिस्थितीत एलपीजी सिलिंडरचे बुकिंग पूर्वीपेक्षा महाग झाले आहे. दरम्यना आज आपण एलपीजी सिलिंडरच्या बुकिंगवर एका जबरदस्त ऑफरबद्दल सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही चांगला फायदा मिळवू शकता.

या ऑफर अंतर्गत, तुम्ही पेटीएम (Paytm) वापरुन तुमचे एलपीजी सिलेंडर बुक केल्यास, तुम्हाला 2700 रुपयांपर्यंतचा बंपर कॅशबॅक मिळू शकतो. सोबतच या ऑफरसोबत तुम्हाला इतर अनेक फायदेही मिळतील. अनेक पेटीएम वापरकर्ते याचा फायदा घेत आहेत. सोबतच पेटीएमच्या खास 3 पे कॅशबॅक ऑफरबद्दल जाणून घेऊया आणि तुम्ही त्याचा फायदा कसा घेऊ शकता ते पाहूया

तुम्ही पेटीएम अॅपवरून तुमचा एलपीजी गॅस सिलिंडर बुक केल्यास तुम्हाला 2700 रुपयांपर्यंतच्या ऑफर मिळतील. यामध्ये तुम्हाला कॅशबॅक सोबतच अनेक उत्तम ऑफर्स आणि रिवॉर्ड्स मिळतील. पेटीएमच्या या ऑफरचे नाव आहे 3 पे कॅशबॅक (3 Pay Cashback)

नवे वापरकर्ते या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. तुम्ही तुमचा एलपीजी सिलेंडर सलग तीन वेळा Paytm वरुन बुक केल्यास, तुम्हाला पहिल्या बुकिंगवर तीन महिन्यांसाठी 900 पर्यंतचा खात्रीशीर कॅशबॅक मिळेल. ऑफरवर उपलब्ध असलेला हा कॅशबॅक 10 ते 900 रुपयांदरम्यान असू शकतो. या ऑफरसाठी विविध अटी आणि शर्ती लागू आहेत.

याशिवाय एलपीजी गॅस सिलिंडर बुक केल्यावर तुम्हाला खात्रीशीर बक्षिसे आणि 5 हजारांपर्यंत कॅशबॅक पॉइंट देखील मिळतील. तुम्ही हे पॉंइट्स इतर ब्रँडवर आणि गिफ्ट व्हाउचरच्या स्वरूपात वापरू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan Firing: त्याने स्वतःला संपवलं नाही..अनुज थापरची हत्या? कुटुंबीयांच्या दाव्याने एकच खळबळ

Viral Video: खिशात खेळण्यातली पिस्तूल सापडल्यानंतर पकडले कान, मुंबई मेट्रो स्टेशन वरील चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Heeramandi: हिरामंडी पाहिल्यानंतर 'या' कारणामुळे भडकला अभिनेता; म्हणाला, "इतका अन्याय का? निराशाजनक! "

Latest Marathi News Live Update : अंधेरी पंप परिसरात मोठी आग, दारू दुकान जळून खाक

SCROLL FOR NEXT