LTIMindtree sakal
विज्ञान-तंत्र

LTIMindtree: LTI आणि Mindtree चे विलीनीकरण मंजूर, देशातील सर्वात मोठी IT फर्म बनणार

भारतीय आयटी क्षेत्रातील हे सर्वात मोठे विलीनीकरण आहे.

सकाळ डिजिटल टीम

L&T Infotech आणि Mindtree यांना विलीनीकरणासाठी मंजुरी मिळाली आहे. 14 नोव्हेंबरपासून ते विलीन झालेली संस्था म्हणून काम सुरू करेल. मार्केट कॅपनुसार ती देशातील पाचवी सर्वात मोठी आयटी सेवा पुरवणारी आणि कमाईच्या बाबतीत सहावी सर्वात मोठी फर्म बनेल. भारतीय आयटी क्षेत्रातील हे सर्वात मोठे विलीनीकरण आहे.

ही कंपनी आता LTIMindtree म्हणून ओळखले जाईल. दोन्ही कंपन्या एकत्र आल्यामुळे मोठ्या प्रमाणावर आउटसोर्सिंग कॉन्ट्रॅक्ट्स मिळवण्याची आणि वेगाने वाढ होण्याची संधी कंपनीला मिळणार आहे.

हेही वाचा : मामाच्या जमिनीवरून सावकाराला पळविणारा 'डेबू' कसा बनला गाडगेबाबा.....

L&T समूहाचे अध्यक्ष ए.एम नाईक म्हणाले की, विलीनीकरणास राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाच्या मुंबई आणि बेंगळुरू या दोन्ही खंडपीठांनी दोन वेगवेगळ्या आदेशांमध्ये मान्यता दिली आहे. नाईक म्हणाले की, विलीनीकरणामुळे L&T ला 2026 पर्यंत समूहाच्या एकूण व्यवसायाच्या 25 टक्क्यांपर्यंत आयटी सेवांचा विस्तार करण्याचे लक्ष्य साध्य करण्यात मदत होईल.

नाईक म्हणाले की, आम्ही आगामी काळात मोठ्या सौद्यांची अपेक्षा करू शकतो. LTIMindtree पुढील 5 वर्षांमध्ये चांगल्या पद्धतीने वाढण्याची आणि मोठा विकास दर गाठण्याची अपेक्षा आहे. L&T ने यापूर्वी सांगितले होते की, पुढील 2-3 वर्षात IT सेवांचा बाजार भांडवलात किमान 40 टक्के योगदान असेल.

L&T सॉफ्टवेअरच्या 2 युनिट्सचे विलीनीकरण 6 मे रोजी जाहीर करण्यात आले होते आणि ते या वर्षाच्या अखेरीस पूर्ण होण्याची अपेक्षा होती. एल अँड टी लिमिटेडकडे आता एलटीआय शेअर्सचा वाटा 68.73 टक्के आहे. Mindtree च्या भागधारकांना प्रत्येक 100 Mindtree शेअर्समागे 73 LTI शेअर्सच्या प्रमाणात LTI शेअर्स दिले जातील.

30 सप्टेंबर 2022 पर्यंत, दोन्ही कंपन्यांची एकूण कर्मचारी संख्या 89,271 होती. दोन्ही एकत्र आल्याने संख्येवर कसा परिणाम होईल याबद्दल काहीही सांगितले गेले नाही. त्याच वेळी, विलीनीकरणाच्या कार्यवाहीवर देखरेख ठेवण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे.

माइंडट्रीचे सीईओ देबाशीष चॅटर्जी या संयुक्त संस्थेचे नेतृत्व करतील. चॅटर्जी यांची एकत्रित संस्थेचे CEO म्हणून निवड केली आहे. त्यांची निवड ही कॉग्निझंटमधील पूर्वीच्या अनुभवावर आधारित होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajya Sabha Politics: राज्यसभा निवडणूक बिनविरोध शक्य, आजोबा - नातू एकाचवेळी राज्यसभेत; एकनाथ शिंदेंनी आपल्याच नेत्यांचा केला गेम

'लोकांनी ऐकण्याची क्षमता गमावलीय' नोरा फतेही नेटकऱ्यांवर संतापली, म्हणाली...'समर्थन करणं हे...'

Latest Marathi News Live Update : राज्याचा अर्थसंकल्प आज विधीमंडळात; कोणत्या घोषणा होणार?

Kannad Accident : कन्नड-वैजापूर मार्गावर अपघात; जेहूरचा तरुण जागीच ठार

Whale Vomit Smuggling Case : पाच किलो वजन आणि किंमत कोटींच्या घरात! महाबळेश्वरमध्ये व्हेल माशाच्या उलटीची तस्करी; पुणे, मुंबईसह मालवणचे सात जण ताब्यात

SCROLL FOR NEXT