Luna 25 Crashed eSakal
विज्ञान-तंत्र

Luna 25 Crashed : रशियाची महत्त्वाकांक्षी चांद्रमोहीम फेल; 'लूना 25' चंद्रावर झालं क्रॅश!

रशियाचं लूना 25 हे यान चंद्रावर क्रॅश झाल्याची माहिती समोर आली आहे.

Sudesh

Russia Moon Mission : रशियाच्या चांद्र मोहिमेला मोठा धक्का बसला आहे. 'लूना 25'चंं लँडर हे चंद्रावर क्रॅश झालं आहे. रशियाची स्पेस एजन्सी रॉस्कॉस्मॉसने याबाबतची माहिती दिली.

यामुळे चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणारा पहिला देश ठरण्याचं रशियाचं स्वप्न भंगलं आहे. सोमवारी (21 ऑगस्ट) लूना 25 हे चंद्रावर सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न करणार होतं. मात्र त्यापूर्वी शनिवारी यामध्ये काही तांत्रिक अडचणी समोर आल्या होत्या. यानंतर हा बिघाड दुरुस्त कऱण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र, त्यातच हे लँडर चंद्रावर कोसळलं असल्याचं रशियाने सांगितलं.

47 वर्षांनंतर प्रयत्न

1976 साली पार पडलेल्या Luna 24 या मोहीमेनंतर तब्बल 47 वर्षांनी रशियाने ही चांद्रमोहीम राबवली होती. यामुळेच लूना 25 कडून रशियाला मोठ्या आशा होत्या. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाण्याचं अस्तित्व शोधून, त्याठिकाणी पुढील एक वर्षांपर्यंत संशोधन करण्याच्या उद्देश्याने लूना-25 चं प्रक्षेपण करण्यात आलं होतं.

कशामुळे झाला अपघात?

शनिवारी (19 ऑगस्ट) लूना-25 ला चंद्राच्या आणखी जवळच्या ऑर्बिटमध्ये नेण्यासाठी प्रयत्न करण्यात येत होता. लँडिंगसाठी ही प्रक्रिया आवश्यक होती. मात्र, यावेळी लूना-25 च्या लँडरमध्ये काही तांत्रिक अडचणी आल्या. यामुळे ही प्रक्रिया पूर्ण करता आली नाही. यानंतर पुन्हा प्रयत्न करताना लूनाचं लँडर चंद्राच्या अनियोजित कक्षेत पोहोचलं. यानंतर लँडरचा ताबा सुटला आणि ते चंद्रावर क्रॅश झालं.

यानंतर रॉस्कॉस्मॉसमधील वैज्ञानिक सातत्याने लँडरचा शोध घेण्याचा आणि त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. मात्र या प्रयत्नांना यश मिळालं नाही. अखेर ही मोहीम अयशस्वी झाल्याचं रॉस्कॉस्मॉसने आपल्या अधिकृत टेलिग्राम चॅनलवरून स्पष्ट केलं.

11 ऑगस्टला झालं होतं लाँच

11 ऑगस्ट रोजी 'लूना 25'चं प्रक्षेपण करण्यात आलं होतं. एका शक्तिशाली रॉकेटच्या मदतीने अवघ्या 5 दिवसांमध्ये लूना चंद्राच्या कक्षेत पोहोचलं होतं. यामुळे भारताच्या चांद्रयानानंतर कित्येक दिवसांनी प्रक्षेपण होऊनही, लूना हे भारतापूर्वी चंद्रावर लँड करणार होतं. मात्र, आता रशियाचं हे स्वप्न भंगलं आहे.

रशियाला मोठा धक्का

'लूना 25' अयशस्वी होणं हा रशियासाठी मोठा धक्का आहे. एकेकाळी अंतराळ संशोधनामध्ये अमेरिकेलाही थेट टक्कर देणारं राष्ट्र म्हणून सोव्हिएत रशिया प्रसिद्ध होतं. मात्र, गेल्या काही वर्षांपासून रशियाच्या अंतराळ मोहिमा सातत्याने अयशस्वी होत आहेत. यामुळे रशियाला मोठ्या प्रमाणात आर्थिक फटकाही बसतो आहे.

यापूर्वी 2011 साली रशियाने मंगळ ग्रहाच्या चंद्रावर यान पाठवण्याची मोहीम राबवली होती. दुर्दैवाने हे यान पृथ्वीच्या कक्षेबाहेरही जाऊ शकलंं नाही. 2012 मध्ये हे पॅसिफिक समुद्रामध्ये क्रॅश झालं होतं. यानंतर आता लूना 25 यानाकडून रशियाला मोठी अपेक्षा होती, मात्र ही मोहीम देखील अयशस्वी झाली आहे.

जगाचं नुकसान

ही मोहीम रशियाची असली, तरीही यामुळे जगभरातील अंतराळ संशोधन संस्थांना फायदा होणार होता. चंद्राच्या आतापर्यंत लपलेल्या भागात लूना २५ हे सुमारे वर्षभर संशोधन करणार होतं. यामुळे भविष्यातील चांद्रमोहिमांना फायद्याचा ठरेल असा डेटा उपलब्ध होणार होता. मात्र, ही मोहीम फेल झाल्यामुळे संपूर्ण जगाचं, आणि अंतराळ विज्ञान क्षेत्राचं मोठं नुकसान झालं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तान पुन्हा बनतोय 'दहशतवादाचा कारखाना'; जैश-लष्करचे तब्बल 300 नवे अड्डे उभारण्याची तयारी, कोण देतंय इतका पैसा?

हत्तीच्या हल्ल्यात पतीचा मृत्यू, ६ लाखांची नुकसान भरपाई; ६ महिलांचा दावा, म्हणतात,'मीच खरी पत्नी'

AUS vs SA, ODI: १८ षटकार अन् ३६ चौकार! हेड, मार्श अन् ग्रीन बरसले, ऑस्ट्रेलिया ४०० पार; अनेक विक्रम मोडले

Latest Marathi News Updates : साईबाबांच्या लाडू प्रसादामध्ये संस्थानकडून 50 टक्के वाढ

Ganpati Bappa 2025: गणपती बाप्पाला दुर्वा का अर्पण करतात? जाणून घ्या कारण आणि महत्त्व

SCROLL FOR NEXT